शरद पवारांना दुसरा धक्का, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त

Maharashtra State Wrestling: महाराष्ट्रात सत्ताबदल झालेला असतानाच आता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे.

शरद पवारांना दुसरा धक्का, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त
शरद पवारांनी दिले मध्यावधी निवडणुकीचे संकेतImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 10:10 AM

Maharashtra State Wrestling: महाराष्ट्रात सत्ताबदल झालेला असतानाच आता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद (Maharashtra State Wrestling) बरखास्त करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती संघटनेने (indian wrestling association) नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेतला आहे. भारतीय कुस्ती संघटनेचा हा निर्णय शरद पवारांसाठी (Sharad pawar) धक्का आहे. कारण ते महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून राज्यात कुस्ती स्पर्धा आयोजित करणे आणि अन्य निर्णय घेतले जातात. राज्यात कुस्ती संचलनासाठी पुढच्या काही दिवसात ॲड हॉक समितीची निवड करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीसह इतर निर्णय घेतले जातील.

बरखास्तीमागची कारणं काय?

भारतीय कुस्ती संघटनेच्या काही प्रस्तावांना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, हे सुद्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यामागचं एक कारण आहे. त्याशिवाय राज्यातील मल्लांकडूनही राज्य कुस्तीगीर परिषदेबाबत तक्रारी आल्या होत्या. 15 वर्षाखालील गटासाठी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यास महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, असं पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. 23 वर्षाखालील गटासाठी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यासही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद तयार झाली नाही. ही बरखास्ती मागची काही कारणं आहेत.

कुस्तीमध्ये महाराष्ट्राचा मोठा नाव लौकीक

भारतीय कुस्ती संघटनेच्या निर्देशांचे पालन होत नसल्यामुळे संलग्नता रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला होता. पण महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेकडून अपेक्षित हालचाल न झाल्यामुळे अखेर हा निर्णय घेतला. देशात कुस्तीमध्ये महाराष्ट्राचा एक मोठा नावलौकीक आहे. महाराष्ट्राच्या मल्लांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत.

शरद पवारांसाठी दुसरा धक्का

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची बरखास्ती हा शरद पवारांसाठी धक्का आहे. कारण ते या परिषदेचे अध्यक्ष होते. अलीकडेच महाराष्ट्रात सत्ताबदल झाला आहे. शरद पवार यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच सरकार कोसळलं. त्यांचा पक्ष सत्तेत प्रमुख भागीदार होता. त्या झटक्यानंतर हा दुसरा धक्का मानला जातोय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.