MS Dhoni : महेंद्रसिंह धोनीला अकाऊंटवरुन ट्विटरचा यूटर्न, ब्ल्यू टिक पुन्हा दिली
मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरनं भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी यांच्या ट्विटर अकाऊंटची ब्ल्यू टिक पुन्हा दिली. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबत ट्विट केलं होतं.
नवी दिल्ली: मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरनं भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी यांच्या ट्विटर अकाऊंटची ब्ल्यू टिक हटवली होती. मात्र, काही वेळानंतर धोनीच्या अकाऊंटची टिक पुन्हा देण्यात आलीय. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबत ट्विट केलं होतं. महेंद्रसिंह धोनीनं शेवटचं ट्विट जानेवारी महिन्यात केलं आहे.
Twitter removes blue verified badge from MS Dhoni’s account
Read @ANI Story | https://t.co/9im1LbKt4S pic.twitter.com/vdGLH4NgDW
— ANI Digital (@ani_digital) August 6, 2021
ब्ल्यू टिक असलेलं ट्विटर अकाऊंट हे वेरिफायड आणि ऑथेनटिक समजलं जातं. ट्विटरकडून नामवंत व्यक्तींच्या अकाऊंटला ब्ल्यू बॅज दिला जातो. गेल्या काही दिवसांपूर्वी ट्विटरनं भारतातील मोठ्या नेत्यांच्या अकाऊंटची ब्ल्यू टिक हटवली होती.
महेंद्रसिंह धोनीचं शेवटचं ट्विट
If I keep going to the farm there won’t be any strawberry left for the market https://t.co/2AFuwOrmCA
— Mahendra Singh Dhoni (@msdhoni) January 8, 2021
2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याने 15 ऑगस्ट 2020 रोजी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला, तरी तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे.
धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियानं आयसीसीच्या तीन स्पर्धा जिंकल्या
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने अनेक सामने जिंकले आहेत. 2008 ते 2014 दरम्यान धोनी कसोटी सामन्यांचा कर्णधार होता. त्याने 2007 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत टी-20 ट्रॉफी जिंकली होती. 2010 आणि 2016 साली त्याने आशिया कप जिंकला आहे. 2011 साली त्याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2013 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील जिंकली होती.
महेंद्रसिंह धोनीची कारकीर्द
महेंद्र सिंह धोनीने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी सामने खेळले. या कसोटी सामन्यांमध्ये त्याने 6 शतक, एक द्विशतक, 33 अर्धशतक केले आहेत. त्याने कसोटी सामन्यात एकूण 4 हजार 876 धावा केल्या आहेत. धोनीने 350 एकदिवसीय सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 10 हजार 773 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 शतक, 79 अर्धशतकांचा समावेश आहे. धोनी आपल्या कारकीर्दीत 98 टी-20 सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 1 हजार 617 धावा केल्या आहेत. धोनीने 190 आयपीएल सामने खेळले. यामध्ये त्याने एकूण 4 हजार 432 धावा केल्या आहेत. धोनीने आपल्या कारकिर्दीत एकूण 16 शतक केले आहेत. यामध्ये 10 शतक हे एकदिवसीय सामन्यांमधील आहेत. तर 6 शतक हे मालिका सामन्यांमधील आहेत.
इतर बातम्या:
PHOTO : कॅप्टन कूलचा ‘कूल हेअरकट’, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, फॅन्सकडून लाईक्सचा पाऊस
Mahendra Singh Dhoni twitter blue verified badge restored by twitter