मालवणचो झील दर्शन बांदेकर ‘मुंबई इंडियन्स’मध्ये
दर्शन बांदेकर हा मूळ देवबाग येथील रहिवासी आहे. मुंबई इंडियन्सच्या 35 जणांच्या चमूत त्याची निवड झाली आहे.
मुंबई : मालवणचो झील दर्शन बांदेकर याची ‘आयपीएल 2020’ मधील ‘मुंबई इंडियन्स’मध्ये वर्णी लागली आहे. ‘स्पीडस्टार’ अशी ओळख असलेल्या दर्शन बांदेकरची मुंबई इंडियन्सच्या 35 जणांच्या चमूत निवड झाली आहे. (Malvan born Darshan Bandekar selected in Mumbai Indians Team of 35 for IPL 2020)
दुबई येथील आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना नेट्समध्ये फलंदाजाची सराव देण्यासाठी दर्शन बांदेकर या वेगवान गोलंदाजीची निवड करण्यात आली आहे. 21 ऑगस्ट रोजी दर्शन बांदेकर मुंबई इंडियन्सच्या चमूसह दुबईला प्रयाण करणार आहे.
दर्शनच्या गौरवास्पद कामगिरीबद्दल क्रीडा रसिकांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. दर्शनच्या निवडीमुळे त्याचे कुटुंबीय आणि चाहतेही भारावून गेले आहेत.
हेही वाचा : ‘धोनीने ठोकलेला षटकार जिथे पडला, ते वानखेडेतील आसन राखीव ठेवा’
दर्शन बांदेकर हा मूळ देवबाग येथील रहिवासी आहे. दर्शन बांदेकरचे शालेय शिक्षण डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग येथे झाले. त्यानंतर त्याने अकरावी व बारावीचे शिक्षण नाशिक येथे पूर्ण केले.
दर्शनला लहानपणापासून क्रिकेटची आवड आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. वेगवान गोलंदाजी हे दर्शनचे प्रभावी अस्त्र आहे. आता ‘आयपीएल 2020’ मधील ‘मुंबई इंडियन्स’च्या संघात दर्शनचे दर्शन प्रत्यक्ष मैदानात होणार का, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात ‘आदित्य ठाकरे’!
महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी नावसाधर्म्य असलेला आदित्य ठाकरे हा विदर्भाचा पोट्ट्या! ‘आयपीएल’साठी किती खेळाडू यूएईला न्यायचे, यावर बीसीसीआयने बंधन घातलेले आहे. पण यूएईमध्ये फलंदाजांना अधिकाधिक सरावासाठी विविधता असलेले गोलंदाज आवश्यक आहेत. ही गरज ओळखून ‘आरसीबी’ संघ व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाज आदित्य ठाकरेची निवड केल्याची माहिती आहे. (Malvan born Darshan Bandekar selected in Mumbai Indians Team of 35 for IPL 2020)
आदित्य ठाकरे हा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चांगली गोलंदाजी करत आहे. 2018 मध्ये झालेल्या 18 वर्षांखालील युवा विश्वचषकातही आदित्यने दमदार कामगिरी केली आणि तो प्रकाशझोतात आला. आदित्यने स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याची वर्णी यावर्षी आरसीबीच्या चमूमध्ये लागल्याचे बोलले जाते.
मुंबई इंडियन्सने ट्विटरवर क्रिकेटपटूच्या सरावाचे काही फोटो शेअर केले आहेत.
मुंबईचा मुलगा is ready to don the MI Blue & Gold again! ?#OneFamily @dhawal_kulkarni pic.twitter.com/HOv7pcCpxT
— Mumbai Indians (@mipaltan) August 19, 2020
(Malvan born Darshan Bandekar selected in Mumbai Indians Team of 35 for IPL 2020)