AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : आधी धाकटा भाऊ संघात, मग मुंबईच्या पलटणने आफ्रिकेहून मोठ्या भावाला बोलावलं

मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. गेल्या आठ मोसमात रोहित शर्माच्या नेतृत्वात हा संघ पाच वेळा विजेता ठरला आहे.

IPL 2021 : आधी धाकटा भाऊ संघात, मग मुंबईच्या पलटणने आफ्रिकेहून मोठ्या भावाला बोलावलं
Virat Kohli, Marco Jansen and Duan Jansen
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 12:01 AM

चेन्नई : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. गेल्या आठ मोसमात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात हा संघ पाच वेळा विजेता ठरला आहे. मुंबई इंडियन्सच्या यशाचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यांचे युवा खेळाडू. या संघाने आपल्या Talent Scout कार्यक्रमांतर्गत जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या यांसारखे खेळाडू जगासमोर आणले आहेत. संघाने या खेळाडूंना आयपीएलमध्ये संधी दिली आणि आज त्यांची गणना क्रिकेटमधील अव्वल खेळाडूंमध्ये केली जाते. तिघेही मुंबई इंडियन्समधील महत्त्वाचे खेळाडू आहेत. नवीन खेळाडूंना संधी देण्याची मुंबईची ही प्रक्रिया आयपीएल 2021 मध्येही सुरू राहिली. यावेळी मुंबईने देशाच्या सीमा ओलांडल्या आणि दक्षिण आफ्रिकेहून एक हिरा आणला. मार्को यानसन (Marco Jansen) असं या खेळाडूचं नाव आहे. हा 20 वर्षीय खेळाडू डावखुरा वेगवान गोलंदाज आणि लोअर ऑर्डरचा चांगला फलंदाज आहे. (Marco Jansen twin brother Duan Jansen is Mumbai Indians net bowler for IPL 2021)

आयपीएल 2021 च्या सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध मार्को मैदानात उतरला. या सामन्यात त्याने चार षटकांत 28 धावा देत दोन बळी घेतले. आता मुंबईने मार्कोचा जुळा भाऊ डुआनला संघात सामील केल्याची बातमी समोर आली आहे. डुआन यानसन (Duan Jansen) हा नेट गोलंदाज म्हणून मुंबईच्या स्क्वॉडमध्ये सामील झाला आहे. अलीकडेच त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तो भारतात येत असल्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. डुआन देखील 20 वर्षांचा आहे आणि तो एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याने आतापर्यंत 10 प्रथम श्रेणी सामन्यांत 309 धावा जमवल्या आहेत तसेच 29 बळीदेखील मिळवले आहेत. त्याचबरोबर त्याने 8 लिस्ट ए सामन्यांत 12 तर चार टी -20 सामन्यांत दोन बळी मिळवले आहेत. डुआनदेखील डावखुरा वेगवान गोलंदाज आहे.

डुआन मार्कोपेक्षा 15 मिनिटांनी मोठा आहे. पण मार्को जास्त उंच आहे. 2018 मध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर गेला होता, तेव्हा हे दोन्ही खेळाडू टीम इंडियाचे नेट गोलंदाज होते.

अवघ्या 20 लाखात मार्को मुंबईच्या ताफ्यात

दुसऱ्या बाजूला मार्कोदेखील खूप अनुभवी खेळाडू नाही. मार्कोने आतापर्यंत केवळ 12 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, परंतु त्यात त्याने उत्तम स्ट्राइक रेट आणि 20.5 च्या उत्कृष्ट सरासरीने 52 विकेट घेतल्या आहेत. एवढेच नव्हे तर 2 अर्धशतकेही त्याच्या खात्यात जमा आहेत. मार्को केवळ 4 टी -20 सामने खेळला आहे, ज्यात त्याने 2 गडी बाद केले आहेत. तर 13 लिस्ट ए सामन्यात 16 बळी घेतले आहेत. आयपीएल 2021 च्या लिलावात मुंबईने मार्कोला 20 लाखांच्या बेस प्राइसवर घेतले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे एक उदयोन्मुख नाव आहे. पण मुंबईचा संघ गेल्या दोन वर्षांपासून या युवा गोलंदाजावर लक्ष ठेवून होता. जेव्हा लिलावात त्यांनी बेस प्राइसवर त्याला विकत घेतलं तेव्हा संघाचा क्रिकेट संचालक झहीर खानने आश्चर्य व्यक्त केलं होतं.

संबंधित बातम्या

IPL 2021 : सॅम vs टॉम, सख्ख्या भावाने सख्ख्या भावाला तुडवला, 6 बॉलमध्ये 23 धावा झोडल्या!

Prithvi Shaw, IPL 2021 | चेन्नई विरुद्ध पृथ्वीची धमाकेदार खेळी, उलगडलं गमावलेल्या परफॉरमन्सचं रहस्य, विजयानंतर मोठा खुलासा

IPL 2021 : आयपीएलच्या पहिल्या दोन मॅचमध्ये भारताचे दोन दिग्गज खेळाडू जखमी, भारताची डोकेदुखी वाढली!

(Marco Jansen twin brother Duan Jansen is Mumbai Indians net bowler for IPL 2021)

पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा...
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा....
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे.
S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला
S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला.
सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर
सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर.
भारतानं या 9 ठिकाणचे पाकचे हल्ले उधळले अन् 7 मिसाईलचा चुराडा बघा VIDEO
भारतानं या 9 ठिकाणचे पाकचे हल्ले उधळले अन् 7 मिसाईलचा चुराडा बघा VIDEO.
भारतावर हल्ल्याची खुमखुमी पाकिस्तानला भोवली, रात्रभर काय घडलं?
भारतावर हल्ल्याची खुमखुमी पाकिस्तानला भोवली, रात्रभर काय घडलं?.
भारतावर हल्ल्याची खुमखुमी अन् पाकची जिरवली..चायना मेड विमानांचा चुराडा
भारतावर हल्ल्याची खुमखुमी अन् पाकची जिरवली..चायना मेड विमानांचा चुराडा.
भारतावरील हल्ला पाकिस्तानला भोवला, भारताचा करारा जवाब
भारतावरील हल्ला पाकिस्तानला भोवला, भारताचा करारा जवाब.
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.