Pune News | दोन मुलांच्या आईने जागतिक स्पर्धेत केली धमाल…जिंकले दोन सुवर्णपदक
Pune News | पुणे शहरातील 40 डॉक्टर महिलेने जागतिक स्पर्धा गाजवली आहे. या स्पर्धेत दोन सुवर्णपदक त्यांनी पटकवली आहेत. ही कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत. मंगोलियात सुरु असलेल्या वर्ल्ड मास्टर्स पावरलिफ्टिंग स्पर्धेत ही कामगिरी त्यांनी केली आहे.
पुणे | 24 ऑक्टोंबर 2023 : देशात विश्वकरंडक स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाची विजय घौडदौड सुरु आहे. भारताने आतापर्यंत झालेल्या सर्वच सामन्यात विजय मिळवला आहे. यामुळे देशात क्रिकेटमय वातावरण झाले आहे. त्याचवेळी पुणे शहरातील 40 वर्षीय महिलेने कमाल केली आहे. मंगोलियात सुरु असलेल्या वर्ल्ड मास्टर्स पावरलिफ्टिंग स्पर्धेत त्यांनी दोन सुवर्णपदके पटकवले आहे. जागतिक स्पर्धेत अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिली भारतीय झाल्या आहेत. यामुळे क्रिकेटच्या या वातावरणात क्रीडा रसिकांना अधिकच आनंद झाला आहे. त्या आयुर्वेदीक डॉक्टर आहे. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत आहे.
कोणी केली ही कामगिरी
पुणे येथील 40 वर्षीय डॉ. शर्वरी इनामदार यांनी आयुर्वेदमध्ये पदवी घेतली आहे. त्यांना दोन मुले आहेत. त्यानंतर त्यांची फिटनेसची आवड कमी झालेली नाही. त्यांनी यापूर्वी देशातील आणि विदेशातील स्पर्धा गाजवल्या आहेत. आता त्यांनी मंगोलियात सुरु असलेल्या वर्ल्ड मास्टर्स पावरलिफ्टिंग स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकवली आहेत. 57 किलोग्रॅमध्ये खेळून त्यांनी हे यश मिळवले आहे.
दोन सुवर्णपदकांची अशी केली कामाई
शर्वरी यांनी क्लासिक पावरलिफ्टटिंग स्पर्धेत 350 किलोग्रॅम, 127.5 किलोग्रॅम स्क्वाट, 75 किलोग्रॅम बेंच प्रेस वजन उचलत सुवर्णपदक पटकवले. तसेच 147.5 किलोग्रॅम डेड लिफ्टिंगमध्ये त्यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेत इंग्लंडची किर्कपैट्रिक रेबेका (342.5 किलोग्रॅम) यांचा शर्वरी यांनी पराभव केला. आंतरराष्ट्रीय पावरलिफ्टिंग फेडरेशनच्या ‘बेस्ट लिफ्टर्स ऑफ मास्टर्स/स्ट्रॉन्ग वुमन’ च्या यादीत त्यांना दुसरी रँक मिळाली आहे.
डॉ. शर्वरी इनामदार यांचे आहारावर लक्ष
पुणे शहरात राहणाऱ्या डॉ. शर्वरी इनामदार यांनी आयुर्वेदमध्ये एमडी पदवी घेतली आहे. त्यांनी आपल्या फिटनेसवर चांगले लक्ष दिले आहे. मागील अनेक वर्षांपासून त्या नियमित व्यायम करत असताना आपल्या आहाराकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी ही कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत आहे. यापूर्वी अनेक स्पर्धेत त्यांनी पदके मिळवली आहेत.