AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंतरराष्ट्रीय मैदानात उगवण्याआधीच सूर्यकुमारला नकोशा विक्रमाचे ग्रहण

मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण करण्याआधीच 100 आयपीएल सामने खेळले आहेत.

आंतरराष्ट्रीय मैदानात उगवण्याआधीच सूर्यकुमारला नकोशा विक्रमाचे ग्रहण
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 4:31 PM

यूएई : आयपीएलच्या 13 (IPL 2020) व्या मोसमात मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar yadav) बॅटिंगचा जलवा चांगलाच पाहायला मिळतोय. आपल्या तुफानी बॅटिंगच्या जोरावर त्याने प्रतिस्पर्धी टीमच्या बोलर्सला सळो की पळो करुन सोडलंय. त्याच्या याच धडाकेबाज बॅटिंगने त्याच्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद झालीये. त्याच्या या विक्रमाने त्याने बीसीसीआयला आपल्याकडे वळून पाहायला लावलंय.  (MI Suryakumar yadav First player to play 100 match And 2 Thousand runs Without play International Match)

आंतराराष्ट्रीय पदार्पणाआधीच सूर्यकुमारचे आयपीएल 100 सामने आणि 2 हजार रन्स

सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पणाआधीच 100 आयपीएल सामने खेळले आहेत. शिवाय 30.37 सरासरीने तसंच 135 च्या स्ट्राईक रेटने 2 हजार धावा केल्या आहेत. गुरुवारी दिल्लीविरुद्ध झालेल्या प्ले ऑफच्या पहिल्या सामन्यात त्याने 2 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. असा रेकॉर्ड नावावर असणारा सूर्यकुमार हा एकमेव खेळाडू आहे.

आयपीएलच्या 13 व्या मोसमात सूर्यकुमार तळपला

आयपीएलच्या 13 व्या मोसमात सूर्यकुमारने आक्रमक बॅटिंग करत मुंबईला फायनलपर्यंत पोहोचवण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. त्याने 15 मॅचमध्ये 41.90 च्या सरासरीने तसंच 148 च्या तुफानी स्ट्राईक रेटने 461 धावा कुटल्या आहेत. यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. या मोसमात नाबाद 79 हा सूर्यकुमारचा सर्वोच्च स्कोर आहे.

सर्वाधिक रन्स करणाऱ्या बॅट्समनमध्ये सूर्यकुमार 7 नंबरला

यंदाच्या मोसमात सूर्यकुमारचा आक्रमक खेळ पाहायला मिळाला आहे. मुंबईला जेव्हा-जेव्हा गरज असेल तेव्हा तो पीचवर उभा राहिलेला आहे तसंच मुंबईच्या विजयात त्याने मोलाचा वाटा उचलला आहे. आतापर्यंत 4 अर्धशतकांसह 461 रन्ससहित सर्वोच्च धावा करणाऱ्या बॅट्समनमध्ये सूर्यकुमार 7 व्या नंबरला आहे.

पहिल्या क्वालिफायर सामन्यात सूर्यकुमारच्या बॅटचा तडाखा दिल्लीला बसला. केवळ 38 बॉलमध्ये त्याने 51 धावा केल्या. या खेळीमध्ये 6 चौकार आणि 2 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. मॅचच्या दुसऱ्या ओव्हरला मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर मुंबईचला मोठा धक्का बसला होता. मात्र सूर्यकुमारने कोणतंही दडपण न घेता आपल्या आक्रमक खेळीचं दर्शन पुन्हा एकदा दाखवून देत मुंबईला संकटातून बाहेर काढलं. क्विंटन डिकॉकसोबत त्याने 62 रन्सची भागिदारी केली. याचदरम्यान त्याने यंदाच्या मोसमातलं चौथं अर्धशतक पूर्ण केलं.

देशांतर्गत क्रिकेटमध्येही ‘सूर्य’ तळपला

30 वर्षीय सूर्यकुमार यादवने देशांतर्गत क्रिकेटमध्येदेखील (Domestic cricket) उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. 77 प्रथम श्रेणी सामन्यांमद्ये त्याने 44 पेक्षा जास्त सरासरीने 5326 धावा फटकावल्या आहेत. यात 14 शतकं आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. 93 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने 35.46 च्या सरासरीने 2447 धावा फटकावल्या आहेत. यात 2 शतकं आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवचा जलवा पाहायला मिळाला आहे. 156 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 31.81 च्या सरासरीने आणि 140 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 3245 धावा फटकावल्या आहेत.

(MI Suryakumar yadav First player to play 100 match And 2 Thousand runs Without play International Match)

संबंधित बातम्या

IPL 2020, MI vs RCB : सामना एक, किस्से अनेक – सूर्यकुमारला डिवचण्याचा प्रयत्न, हार्दिक-मॉरिसचं शाब्दिक युद्ध, रवी शास्त्रींचा ‘सूर्य’नमस्कार

आमच्या देशाकडून खेळणार का?, तडाखेबाज खेळीनंतर मुंबईच्या सूर्यकुमार यादवला ऑफर

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.