Video | IPL 2021 च्या आधी CSK साठी गुड न्यूज, 18 चेंडूत 86 धावांची तुफानी खेळी, ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना पुनरागमनासाठी सज्ज
सुरेश रैनाने (Suresh Raina) IPL च्या 13 व्या मोसमातून वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली होती.
मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी (IPL 2021) आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. कोरोनानंतर आयपीएलचं आयोजन हे भारतातच होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. यामुळे क्रिकेट चाहते आणि क्रिकेटपटूही उत्साहित आहेत. या स्पर्धेसाठी प्रत्येक फँचायजींनी नुकत्याच पार पडलेल्या लिलावातून खेळाडू आपल्या ताफ्यात घेतले. चेन्नई सुपर किंग्जसाठी (Chennai Super Kings) लिलावानंतरच्या काही दिवसानंतर एकामागोमाग एक दिवस आनंदाचे राहिले आहेत. विजय हजारे ट्रॉफीत चेन्नईच्या संघात असलेल्या रॉबिन उथप्पा, नारायण जगदीशन आणि ऋतुराज गायकवाडने आपल्या संघाकडून खेळताना शतक लगावलं आहे. त्यात आता चेन्नईचा स्टार खेळाडू मिस्टर आयपीएल सुरेश रैनाही (Suresh Raina) पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. रैनाने दमदार शतक ठोकत प्रतिस्पर्ध्यांना सावध राहण्याचे संकेत दिले आहेत. (mister ipl suresh raina hit 104 runs in only 46 balls in local t 20 macth)
46 चेंडूत तडाखेदार 104 धावा
आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या दृष्टीने रैनाने सरावाला सुरुवात केली आहे. रैनाने एका स्थानिय सामन्यात तडाखेबाज फलंदाजी केली. शनिवारी 20 फेब्रुवारीला या सामन्याचं आयोजन गुरुग्राममध्ये करण्यात आलं होतं. या सामन्यात रैनाने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. रैनाने अक्षरक्ष: 46 चेंडूत 11 चौकार आणि 7 उत्तुंग षटकारांसह तडाखेदार 104 धावा चोपल्या. रैनाच्या या दणकेदार शतकी खेळीच्या जोरावर संघाने 1 चेंडू राखून 230 धावांचे विजयी आव्हान पूर्ण केलं.
@ImRaina Scored 104 In Just 39 Balls Against Panipat ?
Good Signs Ahead Of IPL 2021 ??#SureshRaina • #Raina • #CSK pic.twitter.com/M3gPa5p3gi
— Suresh Raina FC™ (@CultRaina) February 20, 2021
रैनाने या आक्रमक खेळीसह आपण आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे रैना या 14 पर्वात नक्की कशी कामगिरी करतो, याकडे सर्व रैना समर्थकांचे लक्ष असणार आहे.
रैनाची गत मोसमात ऐनवेळेस माघार
आयपीएलच्या 13 व्या मोसमाचं आयोजन हे कोरोनामुळे यूएईमध्ये करण्यात आलं होतं. मात्र सुरेश रैना आणि हरभजन सिंह या चेन्नईच्या महत्वाच्या खेळाडूंनी ऐनवेळेस माघार घेतली. याचा परिणाम टीमच्या कामगिरीवर दिसून आला. प्रत्येक मोसमात प्लेऑफमध्ये धडक मारणाऱ्या चेन्नईचे 13 व्या मोसमातील आव्हान हे साखळी फेरीतच संपुष्टात आलं होतं. चेन्नईने गत मोसमात पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर होती.
चेन्नईची आयपीएल 2021 साठी टीम
महेंद्रसिंह धोनी, इमरान ताहीर, लुंगी एन्गिडी, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, रवींद्र जाडेजा, दीपक चाहर, नारायण जगदीशन, सुरेश रैना, मिचेल सँटनर, केएम आसिफ, शार्दुल ठाकुर, आर. साई किशोर, फॅफ डु प्लेसीस, ड्वेन ब्राव्हो, जोश हेझलवुड, सॅम करन, कर्ण शर्मा, रॉबिन उथप्पा, के गौतम, मोईन अली, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, के भगत वर्मा आणि सी हरि निशांत.
संबंधित बातम्या :
Motera Stadium | जगातील सर्वात मोठं स्टेडियम मोटेरा, टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने भिडणार, वाचा का आहे खास
PHOTO | चेन्नईच्या ‘या’ त्रिमूर्तींची कमाल, विजय हजारे करंडाकातील पहिल्या सामन्यात शतकी खेळी, आयपीएलसाठी सज्ज
(mister ipl suresh raina hit 104 runs in only 46 balls in local t 20 macth)