पाकिस्तानच्या या खेळाडूचा टी-ट्वेन्टी 2020 मध्ये जलवा, सर्वाधिक रन्स करण्याचा रेकॉर्ड नावावर

पाकिस्तानचा धडाकेबाज बॅट्समन मोहम्मद हाफिजने टी-ट्वेन्टी 2020 मध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा मान मिळवला आहे.

पाकिस्तानच्या या खेळाडूचा टी-ट्वेन्टी 2020 मध्ये जलवा, सर्वाधिक रन्स करण्याचा रेकॉर्ड नावावर
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 8:54 AM

नवी दिल्ली : पाकिस्तानचा (pakistan) धडाकेबाज बॅट्समन मोहम्मद हाफिजने (Mohammad Hafeez) टी-ट्वेन्टी 2020 मध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा मान मिळवला आहे. मोहम्मद हाफिजने 2020 मध्ये टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये 8 डावांत 415 रन्स फटकावल्या आहेत. या वर्षी हाफिजने 10 इंटरनॅशनल टी-ट्वेन्टी सामने खेळले. यामध्ये त्याने 4 अर्धशतके ठोकली. (Mohammad Hafeez highest runs in t20 2020 year)

पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध तिसरी टी ट्वेन्टी मॅच जिंकत यावर्षीचा शेवट केला. पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यान 26 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. तिसऱ्या टी-ट्वेन्टीनंतर आता यावर्षी पाकिस्तान आणखी टी-20 मॅच खेळणार नाही. त्यामुळे यावर्षी टी-ट्वेन्टीमध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा मान मोहम्मद हाफिजने मिळवला आहे.

टी-ट्वेन्टीमध्ये सर्वाधिक रन्स करण्याच्या बाततीत मोहम्मद हाफिजने भारतीय बॅट्समन के.एल.राहुलला देखील मागे टाकले आहे. के.एल. राहुलने यावर्षी 10 इंटरनॅशनल टी-ट्वेन्टी मॅच खेळल्या. ज्यामध्ये त्याने 4 अर्धशतकांच्या साहाय्याने 404 धावा ठोकल्या. सर्वाधिक रन्स करणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या नंबरवर इंग्लंडचा डेव्हिड मलान आहे. त्याने 300 पेक्षा अधिक धावा करताना 4 अर्धशतके ठोकली.

विराट कोहलीने यावर्षी खेळताना 9 टी-ट्वेन्टीत 295 रन्स केले. कोहली यावर्षी टी ट्वेन्टीत केवळ एकच अर्धशतक ठोकू शकला. यावर्षी कोहलीसाठी टी-ट्वेन्टी क्रिकेट काही खास ठरलं नाही. दुसरीकडे पाकिस्तानचा बाबर आजमने 8 मॅचमध्ये 6 डावांत बॅटिंग करताना 276 रन्स केले ज्यामध्ये त्याने 4 अर्धशतके ठोकली.

टी ट्वेन्टी 2020 सर्वाधिक रन्स

  1. मोहम्मद हाफिज- 415 रन्स
  2. के.एल.राहुल-404 रन्स
  3. डेव्हिड मलान-

संबंधित बातम्या

अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार तळपला, 44 बॉलमध्येच धडाकेबाज शतक

भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल लग्नबंधनात, धनश्री वर्मासोबत नव्या इनिंगला सुरुवात

Australia vs India | बॉक्सिंग डे कसोटीसाठी रिषभ पंत सज्ज

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.