BREAKING : भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीचा अपघात

या अपघातात अजहरुद्दीन हे थोडक्यात बचावले आहेत. राजस्थानच्या लालसोट कोटा मेगा हायवेवर हा अपघात झाला आहे.

BREAKING : भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीचा अपघात
mohammed azharuddin car accident
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 5:11 PM

राजस्थान : भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात अजहरुद्दीन हे थोडक्यात बचावले आहेत. राजस्थानच्या लालसोट कोटा मेगा हायवेवर हा अपघात झाला आहे. सुरवाल पोलीस स्टेशनजवळ ही घटना घडली.

माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आपल्या कुटुंबियांसह रणथंबोरला जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. अझरुद्दीनसोबत आलेल्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली असल्याचं समोर आलं आहे. अपघातानंतर मोहम्मद अझरुद्दीन हे दुसर्‍या वाहनाने हॉटेलवर पोहोचले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अझहर आणि त्यांच्या कुटुंबियांना प्राथमिक उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे ते ठीक असल्याचे समजताच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर जखमी प्रवाशाला रुग्णालयात नेण्यात आलं आणि प्रथमोपचारानंतर त्याला सोडण्यात आले.

सवाई माधोपूर इथून लढले होते निवडणूक

अझरुद्दीन हे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. सप्टेंबर 2019 मध्ये ते या पदावर निवडून आले होते. इतकंच नाहीतर 2014 मध्ये राजस्थानमधील टोंक-सवाई माधोपूर मतदारसंघातूनही त्यांनी निवडणूकही लढवली होती. पण भाजपाचे सुखबीरसिंग जौनापूरियाकडून त्यांचा पराभव झाला. यापूर्वी ते उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद मतदारसंघाचे खासदारही होते.

क्रिकेट विश्वात अझरुद्दीन यांनी मोठं यश मिळवलं आहे. त्यांनी 47 कसोटी आणि 174 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. तीन विश्वचषकातही ते भारताचे प्रमुख होते. पण नंतर मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे त्यांची क्रिकेट कारकीर्दीला ब्रेक लागला. त्यांनी भारताकडून तब्बल 99 कसोटी सामन्यात 6215 धावा तर 334 एकदिवसीय सामन्यात 9378 धावा केल्या आहेत. इतकंच नाहीतर कसोटीत 22 आणि एकदिवसीय सामन्यात त्यांनी 7 शतकं झळकवली आहेत.

संबंधित बातम्या – 

AUS vs Ind, 3rd Test | स्टार्कचा बंदोबस्त कसा करायचं? तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा मेगाप्लॅन

Ind vs Aus | सिडनीची पसंती कांगारुंना, मात्र 42 वर्षांचा इतिहास बदलण्यास टीम इंडिया सज्ज

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.