IPL 2025 : CSK ला नमवण्याचा फॉर्म्युला सापडला ? धोनीच्याच चुकीची ऋतुराजकडून पुनरावृत्ती ?
चेन्नई सुपर किंग्जला झालेला 'आजार' आयपीएल 2020 मध्येच सुरू झाला. आयपीएल 2025 जवळ येईपर्यंत त्याने अधिक प्रगल्भ स्वरूप धारण केले आहे. आता परिस्थिती अशी आहे की जर त्यावर लवकर उपाय झाला नाही तर सीएसकेसाठी विजेतेपद हे दूरचे स्वप्न ठरेल.

आयपीएलच्या नव्या सीझनला धडाक्यात सुरूवात झाली आहे. आणि सीएसकेला हरवण्याचा फॉर्म्युला आयपीएलमधील इतर संघांना सापडला आहे असं दिसतंय. सीएसकेच्या संघाची कमकुवत बाजू त्यांना सापडली आहे. धोनी सीएसकेचा कर्णधार असताना ही कमजोरी थोडीफार दिसली होती, जी आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली अधिक दिसून आली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा तो कमकुवत दुवा काय आहे, ते 30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल 2025 सामन्यात पुन्हा एकदा दिसून आले. चेन्नई सुपर किंग्ज संघ पुन्हा एकदा 180 प्लसच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयशी ठरला.
धोनीच्या कॅप्टन्सीमध्येच दिसली कमकुवत बाजू
आयपीएलच्या खेळपट्टीवर गेल्या 9 सामन्यांपासून पिवळ्या जर्सीमध्ये खेळणाऱ्या चेन्नईची ही स्थिती आहे, त्यामध्ये त्यांना 180 पेक्षा अधिक धावा करताना झगडावं लागलं आहे आणि हा प्रकार IPL 2020 पासून सुरू आहे, तेव्हा एमएस धोनी संघाचा कर्णधार होता. राजस्थान रॉयल्सने 217 धावांचे लक्ष्य दिले होते, सीएसकेला त्याचा पाठलाग करता आला नाही आणि पराभव पत्करावा लागला. आयपीएल 2022 मध्ये, पंजाब किंग्सने 180 प्लसचे लक्ष्य देऊन CSK ला दोनदा पराभूत केले. त्यांनी एकदा त्याला 181 धावा केल्या तर दुसऱ्या वेळी 188 धावा. CSK ने आयपीएल 2023 चे विजेतेपद तर पटकावलं पण या मोसमातही राजस्थान रॉयल्स विरुद्ध 2023 धावांचे लक्ष्य गाठण्यात ते अपयशी ठरले. धोनी तेव्हा कर्णधार होता. पण, आयपीएल 2024 मध्ये ऋतुराज गायकवाड कर्णधार असतानाही चेन्नई संघाच्या स्थितीत सुधारणा झाली नाही.
गायकवाडच्या कर्णधारपदावेळी उघड झाली कमजोरी
आयपीएल 2024 मध्ये, गुजरात टायटन्सने 232 धावांचा पाठलाग करण्याचे लक्ष्य दिले, पण सीएसकेला ते साध्य करता आले नाही. त्याच मोसमात आरसीबीने 224 धावांचं टार्गेट दिलं होतं, तेही चेन्नई सुपर किंग्जने गाठलं नाही. ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2025 खेळत असलेल्या सीएसकेसमोर आरसीबीने 197 धावांचे लक्ष्य ठेवले. पण तेही पार करता आले नाही. आणि आता तर राजस्थान रॉयल्सने त्यांना फक्त 183 धावांत रोखले.
180 पेक्षा जास्त धावा करा, CSK ला हरवा !
180 प्लसच्या शेवटच्या 9 सामन्यांचं गणित पाहिलं तर दिसतं की CSK ला पराभूत करण्याचे सूत्र अगदी स्पष्ट आहे. धोनीच्या कर्णधारपदाच्या शेवटच्या दिवसांपासून दिसायला लागलेली ही कमकुवत बाजू होती, आता ऋतुराजच्या कर्णधारपदाखाली तर स्पष्ट दिसत आहे. जर CSKने यावर लवकरच कोणताही उपाय शोधला नाही तर सहाव्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकणे सोडा, त्याच्या जवळ पोहोचणेदेखील चेन्नईसाठी कठीण होऊ शकते.