मुलगा मोठा फॅन, 280 कोटी नेटवर्थ असलेला फुटबॉल क्लब अंबानी विकत घेणार?
क्रिकेटकडून अंबानी कुटुंबाचा मोर्चा फुटबॉलकडे? कुठला क्लब आहे हा?
मुंबई: इंग्लंडमधले अनेक फुटबॉल क्लब विक्रीसाठी तयार आहेत. ते योग्य खरेदीदाराच्या शोधात आहेत. या दिग्गज फुटबॉल क्लबमध्ये मॅनचेस्टर युनायटेड आणि लिव्हरपूल या फुटबॉल क्लबची नाव आहेत. योग्य किंमत मिळणार असेल, तर ते आपला अधिकार विकायला तयार आहेत. भारतातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी इंग्लंडमधील फुटबॉल क्लब विकत घेण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. अंबानी यांची रुची नॉर्थ लंडन येथील आर्सेनल क्लबमध्ये आहे. मॅनचेस्ट युनायटेड किंवा लिव्हरपूल या फुटबॉल क्लबच्या खरेदीत त्यांना रस नाहीय.
ग्लेजर कुटुंबाने काय म्हटलेलं?
ग्लेजर कुटुंबाने तीन आठवड्यापूर्वीच मॅनचेस्ट युनायटेडमधील आपला हिस्सा विकण्याची तयारी दाखवली होती. असं झाल्यास मागच्या 17 वर्षांपासूनचा त्यांचा मालकी हक्क संपुष्टात येईल. त्यानंतरच अंबानी हा क्लब विकत घेऊ शकतात, अशा बातम्या आल्या होत्या. पण अंबानी यांना आर्सेनल क्लबमध्ये इंटरेस्ट असल्याची माहिती आहे. आर्सेनलचा नेटवर्थ जवळपास 12.5 बिलियन डॉलर आहे.
मुलगा क्लबचा फॅन
अंबानी यांचा मुलगा आकाश आर्सेनलचा मोठा चाहता आहे. लंडन स्थित हा क्लब विकत घेण्यात अंबानी कुटुंब इंटरेस्ट दाखवू शकतं. द एथलेटिकने हे वृत्त दिलय. अंबानी कुटुंबाची क्रिकेटमध्ये गुंतवणूक आहेच. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सशिवाय अन्य देशाच्या लीग्समध्येही या कुटुंबाने टीम विकत घेतल्यात. सध्या आर्सेनलमध्ये सर्वाधिक हिस्सा क्रोनके स्पोर्ट्स आणि एन्टरटेनमेंटकडे आहे.
भारतात सुरु केली लीग
भारतातही व्यावसायिक फुटबॉल लीग खेळली जाते. इंडियन सुपर लीग असं या फुटबॉल लीगच नाव आहे. या लीगची सुरुवात अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपने केली होती. त्यांची पत्नी नीता अंबानी या लीगच्या सर्वेसर्वा आहेत.