Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Indians : IPL मध्ये खेळता यावं, यासाठी बुमराह एका आठवड्यात दुसऱ्यांदा पोहोचला या खास ठिकाणी

Mumbai Indians : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शेवटचा कसोटी सामना खेळताना बुमराहला दुखापत झाली होती. यंदाच्या IPL 2025 मध्ये बुमराहच्या खेळण्याबद्दल सस्पेन्स आहे. आयपीएलमध्ये खेळता यावं, यासाठी बुमराह एका आठवड्यात दुसऱ्यांदा या खास ठिकाणी पोहोचला.

Mumbai Indians : IPL मध्ये खेळता यावं, यासाठी बुमराह एका आठवड्यात दुसऱ्यांदा पोहोचला या खास ठिकाणी
Mumbai Indians Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 21, 2025 | 10:40 AM

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह IPL 2025 मध्ये खेळणार की नाही? या बद्दल सस्पेन्स कायम आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शेवटचा कसोटी सामना खेळताना बुमराहला दुखापत झाली होती. त्यानंतर तो एकही सामना खेळलेला नाही. बुमराहला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी नॅशनल क्रिकेट अकादमीमधून सर्टिफिकेट घ्यावं लागेल. त्यानंतरच तो मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये दाखल होऊ शकतो. पण अजूनपर्यंत त्याला फिटनेस सर्टिफिकेट मिळालेलं नाही. जसप्रीत बुमराह आयपीएल 2025 आधी पुन्हा एकदा नॅशनल क्रिकेट अकादमीत गेलाय.

आयपीएल 2025 मध्ये खेळण्याची मंजुरी मिळवण्यासाठी तो बंगळुरुला गेलाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार एका आठवड्यात तो दुसऱ्यांदा NCA मध्ये आलाय. इथे पुन्हा एकदा त्याची फिटनेस टेस्ट होईल. बुमराह पूर्णपणे फिट असेल, तर त्याला फिटनेस सर्टिफिकेट मिळेल. मागच्यावेळी त्याला NCA मध्ये गोलंदाजी करताना अडचण जाणवली होती. त्यावेळी NCA च्या अधिकाऱ्यांनी त्याला काही खास एक्सरसाइज करण्याचा सल्ला देऊन पुन्हा येण्यास सांगितलं होतं. त्यामुळे तो पुन्हा एकदा नॅशनल क्रिकेट अकादमीत पोहोचलाय.

किती सामन्यांना मुकू शकतो?

जसप्रीत बुमराह आयपीएल 2025 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळणार नाहीय. पण लवकरच तो मुंबईच्या टीममध्ये दाखल होईल अशी अपेक्षा आहे. जसप्रीत बुमराहला फिटनेसट सर्टिफिकेट जरी मिळालं, तरी त्याला मॅचसाठी फिट व्हायला जवळपास एक आठवडा लागेल. त्यामुळे तो कमीत कमी मुंबईच्या सुरुवातीच्या दोन ते तीन सामन्यांना मुकू शकतो. बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आधी सुद्धा फिटनेस सर्टिफिकेटसाठी NCA मध्ये गेला होता. पण तो फिट नसल्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीममध्ये संधी मिळू शकली नव्हती.

बुमराहला किती कोटी मोजून रिटेन केलय?

बुमराह मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू आहे. आयपीएल 2025 आधी त्याला 18 कोटी रुपये मोजून रिटेन करण्यात आलय. तो मुंबई इंडियन्सच आशास्थान आहे. तो लवकरच फिट होईल अशी मुंबईच्या चाहत्यांना अपेक्षा आहे. मुंबई इंडियन्सचे हेड कोच माहेला जयवर्धने अलीकडेच प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाले की, “तो दुखापतीमधून रिकव्हर होतोय. पुढे काय होतं, त्याची प्रतिक्षा आहे. सध्या सर्वकाही व्यवस्थित आहे. पण आम्हाला दररोज आढावा घ्यावा लागेल. बुमराह टीममध्ये नसणं एक आव्हान आहे. तो जगातील सर्वश्रेष्ठ गोलंदाजांपैकी एक आहे. अनेक वर्षांपासून तो आमचा उत्तम खेळाडू आहे”

एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका.
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?.
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं..
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं...
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.