मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, हुकमी गोलंदाज आयपीएलमधून बाहेर
आयपीएलचं आगामी सीझन सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे (Mumbai Indians replace Bowler Lasith Malinga with Australian pacer James Pattinson).
मुंबई : आयपीएलचं आगामी सीझन सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्स संघाचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आगामी सीझनमध्ये आयपीएल खेळू शकणार नाही. त्याने काही वैयक्तिक कारणास्तव आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सन याला संघात घेण्यात आलं आहे (Mumbai Indians replace Bowler Lasith Malinga with Australian pacer James Pattinson).
मुंबई इंडियन्सच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. “लसिथ मलिंगा आमच्या संघाचा महत्त्वाचा भाग होता. लसिथ एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. मात्र, सध्या त्यांना आपल्या कुटुंबियांसोबत राहणं जास्त जरुरीचं आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. या सीझनमध्ये आम्हाला त्यांची सदैव आठवण येईल”, अशी प्रतिक्रिया मुंबई इंडियन्स संघाचे मालक आकाश अंबानी यांनी दिली आहे.
हेही वाचा : चेन्नई सुपर किंग्जला धक्क्यावर धक्के, सुरेश रैना IPL मधून बाहेर
“मुंबई इंडियन्स संघ हे एक कुटुंब आहे. आमच्यासाठी संघातील प्रत्येक खेळाडू आणि त्यांचं कल्याण महत्त्वाचं आहे”, असं आकाश अंबानी म्हणाले आहेत (Mumbai Indians replace Bowler Lasith Malinga with Australian pacer James Pattinson).
आकाश अंबानी यांनी संघातील नवा खेळाडू जेम्स पॅटिन्सन याचं स्वागत केलं आहे. “जेम्स यांचं संघात येण्याने संघाला बळकटी आली आहे. ते या आठवड्याच्या शेवटी अबुधाबी येथे येऊन मुंबई इंडियन्स संघात सामील होतील”, असं आकाश अंबानी यांनी सांगितलं आहे.
Lasith Malinga will miss this season’s #Dream11IPL with Australian speedster James Pattinson replacing him.
? Read more ?#OneFamily #MumbaiIndians #MI https://t.co/ZllfElMS1J
— Mumbai Indians (@mipaltan) September 2, 2020
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयपीएलचं तेरावं सीझन संयुक्त अरब अमिराती अर्थात UAE मध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यूएईत 19 सप्टेंबरपासून आयपीएलचं तेरावं सीझन सुरु होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्ससह सर्वच संघ यूएईत दाखल झाले आहेत.
हेही वाचा : आयपीएल सुरु होण्याआधीच CSK संघाला मोठा झटका, सपोर्ट स्टाफमधील काही जणांना कोरोना