शेतकऱ्याच्या मुलीचं क्रिकेटर बनण्याचं स्वप्न ! कष्टकरी बापाने शेताचं रुपांतर मैदानात केलं

वडिलांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे मुस्कान वासवा यशाची एक-एक पायरी सर करत आहे (Muskan Waswa father turned farm into ground for daughters dream).

शेतकऱ्याच्या मुलीचं क्रिकेटर बनण्याचं स्वप्न ! कष्टकरी बापाने शेताचं रुपांतर मैदानात केलं
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 9:11 PM

गांधीनगर : भारतीय महिला आज जगभरात विविध क्षेत्रांमध्ये आपलं नाव कमवत आहे. क्रिकेट, बॅटमिंटनपासून ते रेसलिंगपर्यंतच्या सर्वच खेळांमध्ये भारतीय महिला आंतरराष्ट्रीय पातळीवर देशासाठी पदकं जिंकून देत आहेत. त्यांच्या या यशामागे त्यांची प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटी हे कारण तर आहेच. पण या यशामागे त्यांच्या कुटुंबाचंदेखील मोठं योगदान आहे. कारण कुटुंबियांच्या पाठिंब्याशिवाय महिला त्या सर्वोच्च पदावर पोहोचणं शक्य नाही. आम्ही तुम्हाला आज अशाच एका यशस्वी तरुणीची कहाणी सांगणार आहोत. ही तरुणी गुजरातच्या भरुच या जिल्ह्यातील असून तिचं नाव मुस्कान वासवा असं आहे. तिचं आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळण्याचं स्वप्न आहे. या स्वप्नासाठी तिच्या शेतकरी वडिलांनी चक्क शेताचं रुपांतर मैदानात केलं आहे (Muskan Waswa father turned farm into ground for daughters dream).

अनेकांचे टोमणे सहन करत पाठिंबा

वडिलांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे मुस्कान वासवा यशाची एक-एक पायरी सर करत आहे. तिचं नुकतंच गुजरातच्या सीनिअर टीमसाठी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तिच्या जिल्ह्यातील ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तिच्या या यशामागे ती सर्व श्रेय आपल्या वडिलांना देतेय. मुस्कानच्या वडिलांनी गावातील, समाजातील अनेक लोकांचे टोमणे सहन करत तिला पाठिंबा दिला. वडिलांचा त्याग, पाठिंबा आणि प्रेम पाहून तिने आंतरराष्ट्रीय पातळीवरचं क्रिकेटर व्हायचं स्वप्न बघितलं आहे. तिच्या या स्वप्नासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याचा निश्चिय तिच्या वडिलांनी केला आहे (Muskan Waswa father turned farm into ground for daughters dream).

मुलीच्या स्वप्नासाठी शेताचं रुपांतर मैदानात केलं

आपला भाऊ आणि वडिलांना बघूनच क्रिकेटर बनण्याचं स्वप्न जागृत झालं, असं मुस्कानने सांगितलं. “मी वडिलांना जेव्हा क्रिकेटर बनण्याचं स्वप्न असल्याचं सांगितलं तेव्हा त्यांनी मला पाठिंबा देण्याचं ठरवलं. माझा घरीच सराव व्हावा यासाठी वडिलांनी आपल्या शेताचं रुपांतर ग्राऊंडमध्ये केलं”, असं मुस्कानने सांगितलं. मुस्कानची याआधी जिल्ह्याच्या अंडर-19 टीममध्ये निवड झाली होती. त्यावेळी मुस्काने फलंदाजीत प्रचंड चांगली कामगिरी करुन दाखवली होती.

मुस्कानच्या स्वप्नासांठी तिच्या वडिलांनी खस्ता खाल्या

मुस्कानने क्रिकेटर व्हावं, यासाठी तिच्या वडिलांना प्रचंड खस्ता खाव्या लागल्या. भरुच जिल्हा हा महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या बडोदा संस्थान भागात येत नाही. त्यामुळे तिला सुरुवातीला काही अडचणींचा सामना करावा लागला होता. मुस्कानच्या वडिलांनी बडोदा क्रिकेट असोसिएशनमधून एनओसी मिळवली, त्यानंतर ती भरुच जिल्हा क्रिकेट संघात खेळू लागली. त्यांनी अंकलेश्वर येथील हाय टच क्रिकेट अकादमीत आपल्या मुलीचं अॅडमिशन केलं. पुढे मुस्कानची भरुच जिल्ह्याच्या अंडर-19 टीममध्ये निवड झाली.

मुस्कानच्या प्रगतीवर वडील समाधानी

मुलीच्या यशावर मुस्कानचे वडील आनंदी आहेत. “माझ्या मुलीची निवड झाली, यासाठी मी खूप खूश आहे. तिने देशासाठी खेळावं आणि देशाचं नाव रोशन करावं, अशी माझी इच्छा आहे”, अशी प्रतिक्रिया मुस्कानच्या वडिलांनी दिली.

हेही वाचा : Success Story : चहा पावडर विकून महिला कोट्यधीश, वार्षिक टर्नओव्हर बघाल तर थक्क व्हाल

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.