Narendra Modi Govt 8th anniversary: मोदी सरकारने ऑलिंपिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन काय केलं? ते जाणून घ्या…

ऑलिम्पिक (Olympic) किंवा एशियाड सारख्या मोठ्या भव्य क्रीडा स्पर्धा सुरु होतात, तेव्हा आपल्या सर्वांना भरभरुन पदकांची अपेक्षा असते. पण दिवसाअखेरीस पदक जिंकलेल्या देशांचे (Medal winning country) आकडे समोर येतात, तेव्हा मात्र आपली निराशा होते.

Narendra Modi Govt 8th anniversary: मोदी सरकारने ऑलिंपिक स्पर्धा डोळ्यासमोर  ठेऊन काय केलं? ते जाणून घ्या...
Narendra modi govt sports
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 4:00 PM

मुंबई: ऑलिम्पिक (Olympic) किंवा एशियाड सारख्या मोठ्या भव्य क्रीडा स्पर्धा सुरु होतात, तेव्हा आपल्या सर्वांना भरभरुन पदकांची अपेक्षा असते. पण दिवसाअखेरीस पदक जिंकलेल्या देशांचे (Medal winning country) आकडे समोर येतात, तेव्हा मात्र आपली निराशा होते. कारण त्यामध्ये आपण कुठेच नसतो किंवा तळाला असतो. भारतात क्रिकेट (Cricket) व्यतिरिक्त अन्य खेळांची स्थिती काय आहे, हे आपल्याला ठाऊक आहे. ऑलिम्पिक स्पर्धा दर चार वर्षातून एकदा होते. त्या तीन वर्षांमध्ये अन्य खेळांमध्ये भारत कुठे आहे? भारतीय क्रीडापटुंनी कुठल्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला? क्रीडापटुंना कुठल्या समस्यांचा सामना करावा लागला, या बद्दल फार कमी जणांना माहिती असते. अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया सारखे देश ऑलिम्पिकमध्ये भरभरुन पदक जिंकतात, तेव्हा त्यामागे त्यांनी वर्षानुवर्ष केलेली मेहनत असते. एका खेळाडूला घडवण्यासाठी, त्याला काय हवं-नको ते उपलब्ध करुन देण्यासाठी, खेळासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी हे देश गुंतवणूक करतात. त्यातून एक खेळाडू घडतो. देशाच्या खात्यावर पदक जमा होतं.

भारतात क्रिकेट व्यतिरिक्त अन्य खेळ आणि क्रीडापटूंना आपण नेहमीच संघर्ष करताना पाहिलय. आता ही परिस्थिती हळूहळू बदलतेय. प्रतिभावान खेळाडूंची कुंचबणा होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने सुद्धा आपल्या बाजूने पावलं उचलली आहेत. ‘टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीम’ ही केंद्र सरकारने आखलेली एक योजना आहे.

  1. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्गत नरेंद्र मोदी सरकारने 2014 साली ‘टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीम’ ही योजना सुरु केली.
  2. 2016 रियो त्यानंतर 2020 टोक्यो ऑलिंपिक स्पर्धेत पदक जिंकू शकणाऱ्या खेळाडूंना ‘टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीम’ योजनेतंर्गत आर्थिक सहकार्याचा हात देण्यात आला.
  3. टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीममधून काय-काय मदत मिळू शकते
  4. सुसज्ज क्रीडा संस्थेसह टॉप कोचेसकडून प्रशिक्षणाचा यामध्ये समावेश आहे.
  5. आवश्यक क्रीडा साहित्य खरेदीसाठी आर्थिक मदत
  6. फिजिकल ट्रेनरसह फिजियो थेरपीस्ट सपोर्ट स्टाफ उपलब्ध करुन देणं.
  7. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंना आर्थिक मदत
  8. टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीममधून कुस्तीपटू साक्षी मलिक, बॅडमिंटन पीव्ही सिंधूने देशासाठी पदकविजेती कामगिरी केली.
  9. 2016 पॅरालिम्पिक स्पर्धेत या योजनेद्वारे जी मदत करण्यात आली, त्यातून दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कास्य पदक देशाला मिळालं.
  10. स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियाकडून (साई) टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीमची अमलबजावणी केली जाते.
  11. रियो ऑलिंपिकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टास्क फोर्सची स्थापना केली. त्या टास्क फोर्सच्या रिपोर्टच्या आधारावर मिशन ऑलिंपिक सेलची स्थापना करण्यात आली.
  12. 2018 मध्ये पॅरा अॅथलिटिससाठी 8.2 कोटी रुपये खर्च करण्यात आले. कोचिंग, परदेशात ट्रेनिंग, आवश्यक साहित्य खेळाडूंना उपलब्ध करुन देण्यात आलं.
  13. काही खेळाडूंना 25 हजार आणि 50 हजार रुपयांचा मासिक भत्ता सुद्धा देण्यात येतो.
  14. 2018 च्या आशियाई स्पर्धेत भारताने 69 पदकं जिंकलीत. त्याचवर्षी एशियन पॅरा गेम्समध्ये 72 पदकं मिळवली. यातून टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीमचं यश लक्षात येतं.
  15. सध्या विविध खेळातील 80 क्रीडापटू आणि 20 पॅरा अॅथलिटसना टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीमचा लाभ मिळतोय.
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब.
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?.
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?.
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?.
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी.
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.