नाशिकच्या सत्यजितचे रणजी ट्रॉफीत 11 बळी; सलामीला झुंजार खेळी करून आसामला केले गारद
रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व करताना यश धुलने दोन्ही सामन्यात शतक ठोकले. पदार्पणात अशी खेळी करणारा तो देशातील तिसरा तरुण खेळाडू ठरला. यापूर्वी महाराष्ट्राच्या विराग आवटेने 2012 मध्ये विदर्भाविरुद्ध खेळताना 126 आणि 112 धावांची केली होती. तर गुजरातच्या नरी काँट्रॅक्टर यांनी बडोदाविरुद्ध खेळताना 152 आणि 102 धावांची खेळी केली होती.
नाशिकः नाशिकचा (Nashik) फिरकीपटू गोलंदाज सत्यजित बच्छावने रणजी ट्रॉफीत (Ranji Trophy) झुंजार खेळी करत आसामविरुद्ध सलामीच्या सामन्यात तब्बल 11 बळी (wicket) टिपलेत. या बळीच्या जोरावरच महाराष्ट्राने आसामला धोबी पछाड देत एक डाव आणि सात धावांनी विजय मिळवलाय. कर्णधार अंकित बावनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने हा विजय मिळवला. त्यामुळे गुणतालिकेत सध्या 7 गुण मिळाल्याने महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे नाशिकच्या सुपुत्राच्या या कामगिरीने त्याचे कौतुक होत आहे. सामन्यात तडाखेबंद द्विशतकी खेळी करणाचा पुण्याचा पवन शाह हा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे. पुढील सामान्यातही हे वीर असेच चमकतील, अशी अपेक्षा व्यक्त होतेय.
कसा झाला सामना?
आसाम संघावर फॉलोअनची नामुष्की ओढावली होती. त्यामुळे रविवारी संघाला चौथ्या दिवशी आपला दुसरा डाव अवघ्या 160 धावांमध्ये गुंडाळावा लागला. त्यात महाराष्ट्राकडून नाशिकच्या सत्यजितने 7, मनोज इंगळेने 2 आणि दिव्यांगने एक बळी टिपला. सत्यजितने पहिल्या डाव्यातही 5 बळी टिपले आहेत. त्याच्या या चमकदार कामगिरीमुळे आसामचा संघ अक्षरशः खिळखिळा झाला.
शाहची महत्त्वाची खेळी
सामन्यात पुण्याच्या पवन शाह केलेली 219 धावांची खेळी. यामुळे महाराष्ट्राचा विजय सहज सुकर झाला. सत्यजितच्या अभिमानास्पद खेळीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना, जिल्हा संघ आणि रसिकांना अतिशय आनंद झाला आहे. त्यांनी सत्यजितचे अभिनंदन केले आहे. जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे आणि पदाधिकाऱ्यांनी सत्यजितच्या पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यश धुलचे द्विशतक
रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व करताना यश धुलने दोन्ही सामन्यात शतक ठोकले. पदार्पणात अशी खेळी करणारा तो देशातील तिसरा तरुण खेळाडू ठरला. यापूर्वी महाराष्ट्राच्या विराग आवटेने 2012 मध्ये विदर्भाविरुद्ध खेळताना 126 आणि 112 धावांची केली होती. तर गुजरातच्या नरी काँट्रॅक्टर यांनी बडोदाविरुद्ध खेळताना 152 आणि 102 धावांची खेळी केली होती. त्यानंतर यश धुलने ही खेळी केलीय.
फिरकीपटू सत्यजित चमकला
– आसामविरुद्ध 11 बळी
– पहिल्या डावात 5 बळी
– दुसऱ्यात डावात 7 बळी
– पवन शाहची तडाखेबंद फलंदाजी
– 219 धावांची झुंजार खेळी
– शाह मॅन ऑफ द मॅच
इतर बातम्याः
पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला
‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात
शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात