Neeraj Chopra : नीरज चोप्रा सोबत ‘खेळ’, 1 कोटी रुपये कमी मिळाले, मनु भाकरच काय झालं?

Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पदक विजेती कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित करण्यात येत आहे. सरकारकडून या खेळाडूंना कोट्यवधी रुपयाचे इनाम देण्यात आलय. भारताकडून नीरज चोप्राने सर्वोत्तम प्रदर्शन केलं. त्यामुळे आपल्याला रौप्य पदक मिळालं. कुठल्या एथलीटला किती पैसा दिलाय? त्या बद्दल जाणून घ्या.

Neeraj Chopra : नीरज चोप्रा सोबत 'खेळ', 1 कोटी रुपये कमी मिळाले, मनु भाकरच काय झालं?
neeraj chopra-manu bhakerImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Aug 19, 2024 | 12:12 PM

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या एथलीट्ससाठी हरियाणा सरकारने आपला खजिना उघडलाय. हरियाणा सरकारने पॅरिस ऑलिम्पिकमधील पदक विजेत्या खेळाडूंना इनामी रक्कम जाहीर केलीय. देशासाठी एकमेव रौप्य पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राला मनु भाकरपेक्षा एक कोटी रुपये कमी मिळाले आहेत. हरियाणा सरकारने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 मेडल जिंकणाऱ्या मनु भाकरला इनाम म्हणून 5 कोटी रुपये दिले आहेत. मनु भाकरने 10 मीटर एयर पिस्तुलच्या सिंगल्स इवेंट आणि मिक्स्ड टीम इवेंटमध्ये ब्रॉन्ज मेडल मिळवलं.

नीरज चोप्राला हरियाणा सरकारने 4 कोटी रुपये दिले. मनु भाकरपेक्षा 1 कोटी रुपये त्याला कमी मिळाले आहेत. नीरज चोप्राने जॅविलन थ्रो मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल मिळवलं. फायनलमध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्ण पदक विजेती कामगिरी केली. पण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताकडून सर्वात चांगली कामगिरी नीरज चोप्राने केली. नीरज चोप्राला मनु भाकरपेक्षा 1 कोटी रुपये कमी मिळण्याच कारण हे सुद्धा आहे की, मनूने ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं मिळवली. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात एका खेळाडूने दोन पदकं जिकण्याची ही पहिलीच वेळ आहे. हरियाणा सरकारने ब्रॉन्ज मेडलिस्टसाठी 2.5 कोटी रुपये देण्याच जाहीर केलं होतं. दोन मेडल्समुळे मनुला 5 कोटी रुपये मिळाले.

नीरज-मनूशिवाय अजून कुठल्या खेळाडूंना मिळाले कोट्यवधी रुपये?

हरियाणा सरकारने अजून दोन खेळाडूंना कोट्यवधी रुपये दिले आहेत. मनु भाकरसोबत ब्रॉन्ज मेडल जिंकणाऱ्या सरबजोत सिंहला इनाम म्हणून 2.5 कोटी रुपये देण्यात आले आहेत. कुस्तीमध्ये ब्रॉन्ज मेडल जिंकणाऱ्या अमन सहरावतला सुद्धा 2.5 कोटी रुपये दिले आहेत. अमनने प्यूर्टो रिकोच्या डेरियन क्रूजला हरवून ब्रॉन्ज मेडल मिळवलं.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.