मुंबई : भारताचा स्टार अॅथलीट नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पुन्हा एकदा सोनं लुटलं आहे. ऑलिम्पिकनंतरच्या आपल्या पहिल्या स्पर्धेत त्याने नॅशनल रेकॉर्ड स्थापित केलं. त्यानंतर दुसऱ्या स्पर्धेत त्याने पुन्हा गोल्ड मेडल प्राप्त केलं आहे. फिनलँडमध्ये सुरु असलेल्या कुओर्ताने स्पर्धेत (Kuortane Games 2022) गोल्ड मेडलवर नाव कोरत त्याने पुन्हा एकदा सोन्याची लूट केली आहे. सोनेरी स्वप्न पूर्ण करत असताना त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला. तो भालाफेक करताना त्याचा पाय घसरला. तो खाली पडला. पण त्याने जिद्द सोडली नाही. त्याने त्याचं सोनेरी स्वप्न साकार केलंच.
नीरज चोप्रा ज्याच्या नावासमोर केवळ गोल्ड मेडल हे एकमेव विशेषण चपखल बसतं. आताही त्याने अशीच सोनेरी कामगिरी केली आहे. त्याने पुन्हा एकदा सुवर्णपदक आपल्या नावे केलंय. पण ते करत असताना त्याचा पाय घसरला. तो खाली पडला. पण तोवर त्याने त्याचा भाला फेकलेला होता. त्याचा भाला हवेत होता. तो खाली पडला होता. पण भारतीयांच्या माना अभिमानानं उंचावल्या होत्या. त्याने ही स्पर्धा जिंकली होती.
News from Kuortane: All well with @Neeraj_chopra1 after that bad slip on his third attempt. Nothing to worry ?
Well done #NeerajChopra, congrats for one more top class performance ? #Indianathletics pic.twitter.com/EaMHJAGi6v
— Athletics Federation of India (@afiindia) June 18, 2022
फिनलँडमध्ये सुरु असलेल्या कुओर्ताने स्पर्धेत गोल्ड मेडलवर नाव कोरत आपला शानदार फॉर्म कायम राखलाय. त्याने 86.89 मीटर लांब भाला फेकत गोल्ड मेडल आपल्या नावे केलं. नीजरच्या फॅन्सची अपेक्षा होती की तो 90 मीटरचा मार्क पार करेल, पण तसं होऊ शकलं नाही. नीरजने मागील आठवड्यात तुर्कुमध्ये 89.30 मीटर पर्यंत भाला फेकत पावो नुरमी स्पर्धेत रजत पदक पटकावलं होतं. तो 90 मीटरपासून केवळ 70 सेंटीमीटरने चुकला होता. तर फिनलँडच्या ऑलिव्हर हेलांडेरने 89.83 मीटरचा थ्रो करत सुवर्णपदक पटकावलं होतं.