New Zealand Team For ODIs & T20I : न्यूझीलंडने भारताविरुद्ध दिली नव्या चेहऱ्याला संधी, जाणून घ्या न्यूझीलंडची टीम
आतापर्यंत भारताविरुद्ध त्याने एकही मॅच खेळलेली नाही.
मुंबई : टीम इंडिया (IND) आणि न्यूझिलंड (NZ) या दोन्ही टीमचा विश्वचषक स्पर्धेच्या (T20 World Cup 2022)सेमीफायनलमध्ये पराभव झाला. त्यामुळे दोन्ही टीमचे चाहते निराश झाले होते. टीम इंडिया आणि न्यूझिलंड यांच्यात एकदिवशीय आणि T20 मालिकेसाठी न्यूझिलंडची टीम जाहीर करण्यात आली आहे. न्यूझिलंडच्या एका नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे न्यूझिलंडच्या चाहत्यांचं लक्ष राहणार आहे.
न्यूझिलंडच्या टीममध्ये अधिक बदल करण्यात आलेला नाही. विश्वचषक स्पर्धेत खेळलेले खेळाडू टीममध्ये आहेत. फिन एलेन या युवा खेळाडूला टीम इंडियाविरुद्ध संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे न्यूझिलंडच्या टीम मॅनेजमेंटने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्याला एकदिवसीय सामन्याच्या टीममध्ये सुद्धा संधी देण्यात येणार असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे.
फिन एलेनला मार्टिन गप्टिल याच्या जागेवर टीममध्ये संधी देण्यात आली आहे. 23 वर्षाच्या फिन एलेनने आतापर्यंत T20 आंतरराष्ट्रीय आठ मॅचेस खेळल्या आहेत. आतापर्यंत भारताविरुद्ध त्याने एकही मॅच खेळलेली नाही.
टिम साउदी, मैट हेनरी, लॉकी फर्ग्यूसन, ब्लेयर टिकनर आणि एडम मिल्न हे न्यूझिलंड टीमचे महत्त्वाचे गोलंदाच मालिकेत असतील. ट्रेंट बोल्ट या गोलंदाजाला भारताविरुद्धच्या मालिकेत आराम देण्यात आला आहे.
न्यूझिलंडने 15 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या टीमचं नेतृत्व केन विलियमसन करेल. तीन एकदिवशीय मालिकेसाठी जिमी नीशाम टीममध्ये संधी मिळणार नाही. त्यांच्या जागेवर हेनरी निकल्स हा खेळाडू असेल. जिमी नीशाम त्यांच्या लग्नाच्या तयारीसाठी सुट्टी घेणार आहे.