Corporate Cup | HDFC बँकेच्या टीमने जिंकली News 9 कॉर्पोरेट कप फुटबॉल टुर्नामेंट

Corporate Cup | एचडीएफसी बँक टीम 1 ने News 9 कॉर्पोरेट कप फुटबॉल टुर्नामेंट जिंकली. फायनलमध्ये एचडीएफसी बँक टीम 1 ने इन्फोसिसचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला.

Corporate Cup | HDFC बँकेच्या टीमने जिंकली News 9 कॉर्पोरेट कप फुटबॉल टुर्नामेंट
Follow us
| Updated on: May 07, 2023 | 11:31 PM

पुणे : News 9 ने आयोजित केलेल्या कॉर्पोरेट कप फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना एचडीएफसी बँक टीम 1 आणि इन्फोसिसमध्ये रंगला होता. फायनलमध्ये एचडीएफसी बँक टीम 1 ने बाजी मारली. पेनल्टी शूटआऊटमध्ये रंगलेला हा सामना एचडीएफसी बँक टीम 1 ने 4-3 एका गोलच्या फरकाने जिंकला. निर्धारित वेळेत गोल शुन्य बरोबरी कायम राहिली. त्यामुळे सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला.

एचडीएफसी ही बँकिंग क्षेत्रातील मोठी बँक आहे, तर इन्फोसिस ही आयटी क्षेत्रातील अग्रगण्य बँक आहे. चुरशीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात एचडीएफसी बँक टीम 1 ने विजय मिळवला.

सेमीफायनलचा निकालही पेनल्टी शूटआऊटमध्ये

सेमीफायनलचा पहिला सामना एचडीएफसी बँक टीम 1 आणि एचडीएफसी बँक टीम 2 मध्ये रंगला होता. दोन्ही टीम्स तुल्यबळ होत्या. दोन्ही टीम्सनी सरस खेळ दाखवला. त्यामुळे सामना अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. इथे एचडीएफसी बँक टीम 1 ने 2-0 च्या फरकाने एचडीएफसी बँक टीम 2 वर विजय मिळवला.

इन्फोसिस विजयी

सेमीफायनलचा दुसरा सामना इन्फोसिस आणि Teleprofmance या दोन टीममध्ये रंगला होता. या मॅचमध्ये इन्फोसिसने सरस खेळ दाखवत Teleprofmance वर 2-0 च्या फरकाने विजय मिळवला. एचडीएफसी बँक टीम 1 आणि इन्फोसिसमध्ये अंतिम सामना झाला.

इंडिया लिजेंड्सचा क्रीडा प्रबोधिनीवर विजय

फायनलआधी इंडिया लिजेंड्स आणि क्रीडा प्रबोधिनीमध्ये एक प्रदर्शनीय सामना झाला. इंडिया लिजेंड्समध्ये भारताच प्रतिनिधीत्व केलेले दिग्गज फुटबॉलपटू होते. ही मॅच इंडिया लिजेंड्सने 3-0 ने जिंकली. या मॅचमुळे क्रीडा प्रबोधिनीच्या मुलांना दिग्गज फुटबॉलपटूंसोबत खेळण्याचा एक चांगला अनुभव मिळाला. इंडिया लिजेंड्सच्या आक्रमणापुढे क्रीडा प्रबोधिनीचा बचाव कमकुवत ठरला.

कुठे झाली स्पर्धा?

भारतातील फुटबॉलची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन न्यूज 9 कॉर्पोरेट कप फुटबॉल स्पर्धेच आयोजन करण्यात आलं होतं. पुणे बालेवाडी क्रीडा नगरीमध्ये शुक्रवारी न्यूज 9 कॉर्पोरेट कप फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली. भारतात शालेय स्तरावर फुटबॉल लोकप्रिय आहेच. पण कॉर्पोरेट विश्वातही फुटबॉलबद्दल तितकच आकर्षण, क्रेझ आहे.

न्यूज 9 कॉर्पोरेट कपने वाट मोकळी करुन दिली

कॉर्पोरेटमध्ये काम करणारे अनेकजण वेळात वेळ काढून फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटतात. कॉर्पोरेटमध्ये प्रोफेशनल स्तरावर फुटबॉल खेळणाऱ्यांची संख्या कमी नाहीय. त्यांच्या याच कौशल्याला न्यूज 9 कॉर्पोरेट कप फुटबॉल स्पर्धेने वाट मोकळी करुन दिली. कॉर्पोरेट कपमध्ये किती टीम्स?

6-A साइड टुर्नामेंट असं कॉर्पोरेट कपच स्वरुप होतं. 3 दिवस ही स्पर्धा चालली. एकूण 26 टीम्स कॉर्पोरेट कप फुटबॉल स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. एकूण 8 ग्रुप होते. दोन ठिकाणी एकाचवेळी 4 मैदानात ही स्पर्धा पार पडली. चांगल्या, चांगल्या कॉर्पोरेट टीम्स या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.