IPL 2020, RR vs KXIP : निकोलस पूरनची बाउंड्री लाईनवर भन्नाट फिल्डींग, प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सकडून कौतुक

किंग्ज इलेव्हन पंजाबचा खेळाडू निकोलस पूरनने सीमारेषेवर भन्नाट क्षेत्ररक्षण करत 4 धावा वाचवल्या. मुरुगन आश्विनच्या गोलंदाजीवर संजू सॅमसन याने डीप मिडविकेटला जोरदार फटका लगावला होता. निकोलस पूरनच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे षटकाराच्या जागी राजस्थानला 2 धावा मिळाल्या.(nicholas pooran unbelievable fielding)

IPL 2020, RR vs KXIP : निकोलस पूरनची बाउंड्री लाईनवर भन्नाट फिल्डींग, प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सकडून कौतुक
Follow us
| Updated on: Oct 16, 2020 | 1:03 PM

शारजा- किंग्ज इलेव्हन पंजाबचा खेळाडू निकोलस पूरनने सीमारेषेवर भन्नाट क्षेत्ररक्षण करत 4 धावा वाचवल्या. मुरुगन आश्विनच्या गोलंदाजीवर संजू सॅमसन याने डीप मिडविकेटला जोरदार फटका लगावला होता. निकोलस पूरनच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे षटकाराच्या जागी राजस्थानला 2 धावा मिळाल्या. संघाचा क्षेत्ररक्षणाचा प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सने निकोलस पूरनचे कौतुक केले आहे. (nicholas pooran unbelievable fielding)

राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजी दरम्यान सातव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर संजू सॅमसनने  डीप मिडविकेटला मारलेला फटका अडवण्यासाठी निकोलस पूरन याने सीमारेषेवरून हवेत उडी मारली. त्याच्या या प्रयत्नामुळे संजू सॅमसनला षटकाराच्या जागी अवघ्या दोन धावा मिळाल्या. मात्र, पुढील चेंडूवर संजू सॅमसनने षटकार लगावला.

सचिन तेंडुलकर याच्याकडून निकोलसचे कौतुक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने निकोलस पूरनने केलेल्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक केले आहे. आतापर्यंत पाहिलेले सर्वोत्तम क्षेत्ररक्षण आहे. निकोलसचे क्षेत्ररक्षण अतुल्य आहे, असे सचिनने म्हटले आहे. त्याने याबाबत ट्विट केले आहे.

राजस्थानसमोर 224 धावांचे आव्हान पंजाबच्या संघाने 20 षटकांमध्ये 223 धावा केल्या आहेत. पंजाबच्या दोन्ही सलामीवीर फलदांजांनी राजस्थानच्या गोलदांजांविरुद्ध आक्रमक फलंदाजी केली. मयंक आणि राहुल यांनी 183 धावांची भागिदारी केली. दरम्यान, राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. पंजाबचे दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने 13 तर निकोलस पूरन याने 25 धावा केल्या. राजस्थानच्या संघाने 16.2 षटकांमध्ये 2 बाद 162 धावा केल्या आहेत.

संबंधित बातम्या:

IPL 2020, RR vs KXIP Live Score Update : संजू सॅमसनचे 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण

Mayank Agrawal | पंजाबच्या मयंक अग्रवालची तुफानी खेळी, आयपीएलमध्ये झळकावले पहिले शतक

(nicholas pooran unbelievable fielding)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.