Virat Kohli : विराट कोहलीबद्दल ‘या’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूच चिथावणीखोर वक्तव्य
Virat Kohli : मायदेशात बांग्लादेश आणि न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरीज झाली. सलग झालेल्या या दोन्ही मालिकेत विराट कोहलीच प्रदर्शन खूपच खराब होतं. 5 टेस्ट मॅचमध्ये विराटच्या बॅटमधून फक्त एक अर्धशतक निघालं. त्यामुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी विराटच्या करियरच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.
भारत-ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी काही खेळाडूंसाठी महत्त्वाची सीरीज आहे. सीरीजच्या प्रत्येक कसोटी सामन्यात तुल्यबळ सामना होईल, अशी क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा आहे. काही खेळाडू मोठी भूमिका निभावू शकतात. पण नजर त्या खेळाडूंवर असेल, ज्यांच्या करियरच्या दृष्टीने ही सीरीज निर्णायक ठरेल. विराट कोहली या यादीत सर्वात वरच्या स्थानावर आहे. विराट सध्या खराब फॉर्मचा सामना करतोय. त्याच्या भविष्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. टेस्ट सीरीजआधी एका प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन कॉमेंटेटरने विराट कोहलीला भडकवण्याचा प्रयत्न केलाय. त्याला दुबळा म्हटलय.
न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये विराट कोहलीची बॅट शांत होती. या सीरीजमधील 3 कसोटी सामन्यातील 6 इनिंग्समध्ये विराटच्या बॅटमधून फक्त एक अर्धशतक निघालं. संपूर्ण सीरीजमध्ये त्याने फक्त 93 धावा केल्या. याआधी बांग्लादेश विरुद्ध कसोटी मालिकेतही तो अपयशी ठरला. न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेत टीम इंडियाला 0-3 इतका मोठा दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर कोहलीसह काही खेळाडूंच्या करियरवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपयश आलं, तर पुढची वाट बिकट होईल.
कदाचितच विराट बद्दल कोणी असं बोललं असेल
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरु होण्याआधी संपूर्ण ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये विराट कोहलीची चर्चा आहे. रोज तिथल्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये कोहलीच्या मोठ्या फोटोंसह ‘किंग’, ‘गॉड’, ‘GOAT’ अशी विशेषण त्याच्यासाठी वापरली जात आहेत. त्याशिवाय विराटच्या फॉर्मबद्दलही चर्चा होतेय. माजी ऑस्ट्रेलियान ऑलराऊंडर आणि प्रसिद्ध कॉमेंटेटर कॅरी ओ कीफी यांनी विराटबद्दल काही मत व्यक्त केली आहेत. इतक्या दिवसात कदाचितच विराट बद्दल कोणी असं बोललं असेल.
त्याला भडकवण्याचा प्रयत्न
ऑस्ट्रेलियाई वेबसाइट फॉक्स.कॉम.एयूशी ओ’कीफी टीम इंडियाबद्दल बोलले. या चर्चेत विराटचा विषय येताच ओ’कीफी यांनी विराटला डिवचण्याचा, त्याला भडकवण्याचा प्रयत्न केला. “कोहली एक शानदार खेळाडू आहे. इतक्या वर्षात त्याने ऑस्ट्रेलियाला चांगलच सतावलय. पण स्पोर्ट्समध्ये अनेकदा असं होतं, जेव्हा जंगलाचा राजा दुबळ होतो, तेव्हा तुम्ही त्याला जबरदस्तीने छेडता” असं ओ’कीफी म्हणाले.
कोहलीच ऑस्ट्रेलियात प्रदर्शन कसं?
ओ’कीफी यांना कोहलीची क्षमता माहित आहे, त्यामुळे ते हे सुद्धा बोलले की, “कोहलीसाठी ही सीरीज शानदार ठरली, तर टीम इंडिया जिंकू सुद्धा शकते” सद्य स्थितीत कोहली कसं प्रदर्शन करतो, त्यावर लक्ष आहे, असं ओ’कीफी म्हणाले. कोहलीने आतापर्यंत ऑस्ट्रेलियात खेळताना 13 कसोटी सामन्यात 54 च्या सरासरीने 1352 धावा केल्या आहेत. यात 6 सेंच्युरी आणि 4 हाफ सेंच्युरी आहेत.