VIDEO : पाकिस्तानच्या हॅरिस रौफने अशी कॅच पकडली की, सगळेच आश्चर्यचकीत, एकदा व्हिडिओ बघा
NZ vs PAK : सध्या पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये पाच सामन्यांची T20 सीरीज सुरु आहे. या मॅचमध्ये पाकिस्तानच्या हॅरिस रौफने एक आश्चर्यकारक झेल घेतला. त्याने सगळेच हैराण झालेत. सोशल मीडियावर या कॅचचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

पाकिस्तान क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. दोन्ही टीम्समध्ये पाच सामन्यांची T20 सीरीज सुरु आहे. सीरीजच्या तिसऱ्या मॅचसाठी दोन्ही टीम्स ऑकलंडच्या ईडन पार्कमध्ये आमने-सामने होत्या. या मॅचमध्ये पाकिस्तानच्या हॅरिस रौफने आश्चर्यकारक फिल्डिंग केली. फिन एलनची त्याने पकडलेली कॅच पाहून सगळेच हैराण झाले. पाकिस्तानी टीम आपल्या खराब क्षेत्ररक्षणासाठी ओळखली जाते. पण या कॅचने हॅरिस रौफच कौतुक करायला भाग पाडलय. T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये याच हॅरिसला विराट कोहलीने मोक्याच्या क्षणी मेलबर्नच्या ग्राऊंडवर समोर मारलेला सिक्स आजही भारतीयांच्या लक्षात आहे. या सिक्समधून विराटच टॅलेंट दिसलं होतं.
या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने पहिल्याच ओव्हरमध्ये टीमला यश मिळवून दिलं. पण या विकेटमध्ये हॅरिस रौफच योगदान जास्त होतं. पहिल्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर शाहीद आफ्रिदीने लेग साइडला स्विंग करणारी फुल डिलीवरी टाकली होती. फिन एलनने त्याचा फायदा उचलत चेंडू फ्लिक केला.
कॅचसाठी हॅरिस रौफच कौतुक होतय
शॉर्ट फाइन लेगला चेंडू हवेत उडाला. तिथे हॅरिस रौफ फिल्डिंगला उभा होता. सुरुवातीला असं वाटलं की चेंडू हॅरिसच्या जवळून निघून जाईल. पण चेंडूत जोरात चाललेला. त्याचवेळी हॅरिसने हवेत झेप घेत एक अप्रतिम असा झेल पकडला. या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या कॅचसाठी हॅरिस रौफच कौतुक होतय.
Rauf’s Gravity-Defying Grab!
Haris Rauf takes an absolute stunner at short fine leg to dismiss Finn Allen early in the 3rd T20I!
Catch all the action LIVE on FanCode!📲#NZvPAK pic.twitter.com/8oSoGNerOf
— FanCode (@FanCode) March 21, 2025
पाकिस्तान टीमसाठी ही मॅच खूप महत्त्वाची
पाकिस्तान टीमसाठी ही मॅच खूप महत्त्वाची आहे. सीरीजमध्ये टिकून राहण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत त्यांना ही मॅच जिंकावीच लागेल. याआधीच्या दोन सामन्यात पाकिस्तान टीमचा पराभव झालाय. पाकिस्तानने सीरीजचा पहिला सामना 9 विकेटने गमावला होता. दुसऱ्या सामन्यात पाच विकेटने पराभव झाला.