Sania Mirza च्या वाढदिवशी शोएब मलिकने उचललं एक वेगळच पाऊल, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान सगळेच हैराण
शोएब मलिकने जे पाऊल उचललय त्यामागे नेमका अर्थ काय?
लाहोर: भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाच्या वैवाहिक आयुष्यात सध्या वादळ आलं आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिकच्या घटस्फोटाची चर्चा आहे. याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज सानियाच्या वाढदिवशी एक वेगळच चित्र पहायला मिळालं. आज सानिया मिर्झाचा वाढदिवस आहे. तिला नवरा शोएब मलिकने फोटो शेयर करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शोएब मलिकने त्याचा आणि सानियाचा एक फोटो टि्वट केलाय. त्यामुळे नेमकं या जोडप्याच्या आयुष्यात काय चाललय? असा प्रश्न दोघांच्या चाहत्यांना पडला आहे.
शोएबने टि्वटमध्ये काय म्हटलय?
शोएब मलिकने टि्वट केलय. त्यात त्याने ‘हॅप्पी बर्थ डे सानिया मिर्झा. तुला स्वस्थ आणि सुखी आयुष्य लाभो. आजचा दिवस आनंदाने साजरा कर’ असं त्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. शोएब मलिकने या टि्वटसह एक फोटो पोस्ट केलाय. त्यात त्याने काळ्या रंगाचा शेरवानी घातला आहे. सानिया मिर्झा सुद्धा ब्लॅक ड्रेसमध्ये आहे. हा फोटो पाहून दोघांच्या सुखी संसाराला कोणाची नजर लागलीय, असं अजिबात वाट नाही.
घटस्फोटाच्या चर्चांना कारण काय?
सानिया मिर्झा आणि शोएब मलिकचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. पाकिस्तान आणि यूएईमधील मीडियाच्या हवाल्याने अशा बातम्या येत आहेत. शोएब मलिकने सानिया मिर्झाची फसवणूक केली. त्यामुळे दोघांचा संसार मोडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. अजूनपर्यंत दोघांनी या मुद्यावर काहीही भाष्य केलेलं नाही. सानिया मिर्झाच्या एका सोशल मीडिया पोस्टवरुन तिच्या आयुष्यात सर्व काही आलबेल नसल्याचा अर्थ काढण्यात आला होता.
Happy Birthday to you @MirzaSania Wishing you a very healthy & happy life! Enjoy the day to the fullest… pic.twitter.com/ZdCGnDGLOT
— Shoaib Malik ?? (@realshoaibmalik) November 14, 2022
लग्न कधी झालं?
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचं 2010 साली लग्न झालं होतं. हैदराबादमध्ये हा विवाह झाला. रिसेप्शन लाहोर येथे झालं होतं. शोएब आणि सानियाच्या लग्नावरुन भारतात बरीच टीका टिप्पणी झाली होती. त्यावेळी एका मुलीने शोएबशी आपल्या लग्न झाल्याचा दावा केला होता.