Arshad Nadeem : अर्शदच्या गोल्ड मेडल जिंकण्यावर शोएब मलिकची तिसरी बायको सनाची खास पोस्ट, म्हणाली…
Arshad Nadeem : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर अंतरावर थ्रो करुन गोल्ड मेडल जिंकलं. भारताचा नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानावर राहिला. त्याला रौप्य पदक मिळालं. अर्शद जावेदच्या या प्रदर्शनानंतर शोएब मलिकची तिसरी पत्नी सना जावेदने खास पोस्ट केलीय.
पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आपल्या प्रोफेशनल लाइफप्रमाणे खासगी जीवनासाठी सुद्धा नेहमी चर्चेत असतो. शोएब मलिक त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. सानिया मिर्झा बरोबर घटस्फोट आणि सना जावेससोबत निकाह यामुळे शोएब मलिकची सोशल मीडियावर भरपूर चर्चा झाली. 20 जानेवारी 2024 रोजी शोएब मलिकने सना जावेदसोबत निकाह केला. आता दोघांनी आपआपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पाकिस्तानसाठी गोल्ड मेडल जिंकणाऱ्या अर्शद नदीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
सना जावेदने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर स्टोरीमध्ये अर्शद नदीमचा फोटो शेयर केलाय. सोबत असही लिहिलिय “पाकिस्तानसाठी ऐतिहासिक क्षण, शुभेच्छा. आम्हाला अभिमानाचा क्षण दिल्याबद्दल आभार” सनाच्या पोस्टमधून तिचा आनंद स्पष्टपणे दिसतोय. सनाशिवाय पाकिस्तानच्या अन्य कलाकारांनी नदीमला या शानदार विजयाबद्दल शुभेच्छा देताना पोस्ट शेयर केलीय.
माहिरा खानची अर्शदसाठी पोस्ट
पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री माहिरा खानने सुद्धा अर्शदच्या विजयावर आनंद व्यक्त केला. तिने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये नदीमच्या फोटोसह लिहिलय की, ‘वाह काय थ्रो होता, सर्व रेकॉर्ड मोडले, येस सर, हिरो अर्शद नदीम’
पाकिस्तानचा सुपरस्टारने काय म्हटलं?
पाकिस्तानचा सुपरस्टार हुमायूं सईदने सुद्धा आपला आनंद सर्वांसोबत शेयर केला. त्याने सुद्धा इन्स्टा स्टोरीमध्ये अर्शद नदीमचा फोटो शेयर करताना शुभेच्छा दिल्या. “अर्शद नदीम शुभेच्छा, तुमची जिद्द आणि कठोर मेहनतीमुळे हे शक्य झालय. फक्त सुवर्ण पदक घरी आणलं म्हणून नाही, तुम्ही सर्व रेकॉर्ड मोडले, त्या बद्दल तुमचा अभिमान आहे. मजा आली!” असं हुमायूं सईदने पोस्टमध्ये लिहिलय.
अर्शद नदीमने 92.97 मीटर अंतरावर जॅवलिन थ्रो करुन सुवर्ण पदक मिळवलं. सोबत नवीन ऑलिम्पिक रेकॉर्ड रचला. भारताच्या नीरज चोप्राने फायनलमध्ये 89.45 मीटर अंतरापर्यंत थ्रो करुन रौप्य पदक मिळवलं. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरजने गोल्ड मेडल जिंकलं होतं.