VIDEO : अरे बापरे! पराभूत होताच Novak Djokovic मैदानातच बॅडमिंटन रॅकेट आपटू लागला, नोव्हाकचं रौद्ररुप पाहून सर्वच चकित

सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत्या फायनलमध्ये पराभूत झाला आहे. अंतिम सामन्यात त्याला रशियाच्या डेनिल मेदवेदेवने त्याला मात देत आपलं पहिलं ग्रँडस्लॅम पटकावलं आहे.

VIDEO : अरे बापरे! पराभूत होताच Novak Djokovic मैदानातच बॅडमिंटन रॅकेट आपटू लागला, नोव्हाकचं रौद्ररुप पाहून सर्वच चकित
नोव्हाक जोकोव्हिच
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 12:02 PM

US open 2021: जगातील नंबर 1 चा टेनिसपटू असणारा सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला. रशियाच्या डेनिल मेदवेदेवने त्याला पराभूत करत त्याला एका मोठ्या विक्रमापासून दूर ठेवलं. टेनिस विश्वातील सर्वाधिक म्हणजेच 21 वं वैयक्तीक ग्रँडस्लॅम आणि एकाच वर्षात ऑस्ट्रेलियन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन अशा तीनही ग्रँडस्लॅम विजयानंतर अमेरिकन ओपन जिंकण्याचं नोव्हाकचं स्वप्न तुटलं. नोव्हाकला या पराभवाचा धक्का सहन होत नसल्याने सामना हातातून निसटत असताना नोव्हाकचं रौद्ररुप सर्वांसमोर आलं. तो मैदानातच त्याचं बॅडमिंटन रॅकेट आपटू लागला.

वैतागलेल्या नोव्हाकचा हा रॅकेट आपटतानाचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये सामना सुरु असताना मेदवेदेवने पहिला सेट जिंकत सामन्यात आघाडी घेतली. त्याने नंतर पुढे जाऊनही आपला सामन्यातील दबदबा कायम ठेवला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये एक पॉइंट गमावताच नोव्हाक इतका वैतागला की त्याने त्याचे रॅकेट जोरजोरात जमिनीवर आपटण्यास सुरुवात केली. हे दृष्य पाहून सर्वचजण हैरान झाले आहेत.

असा झाला सामना

नोव्हाक आणि डॅनिल यांच्यातील सामना अत्यंत चुरशीचा आणि उत्कठांवर्धक झाला. फायनलमध्ये नोव्हाकला सरळ तीन सेट्समध्ये पराभव मिळाला असला तरी त्याने संपूर्ण सामन्यात आपल्या नावलौकीकाप्रमाणे कडवी झुंज दिली. डॅनिल आणि नोव्हाक यांच्यातील सामना तब्बल 2 तास 16 मिनिटे चालू होता. यामध्ये डॅनिलने नोव्हाकला 6-4, 6-4 आणि 6-4 अशा थेट फरकाने पराभूत केलं.

‘कॅलेंडर स्लॅम’ हुकलं

आजच्या विजयासोबतच नोव्हाकच्या नावावर ‘कॅलेंडर स्लॅम’ हा विक्रमही झाला असता. यंदा नोव्हाकने ऑस्ट्रेलियन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन अशा तीनही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्यामुळे अमेरिकन ओपन जिंकला असता तर तो एका वर्षात इतक्या स्पर्धा जिंकणारा मागील बराच वर्षातील पहिलाच खेळाडू ठरला असता. याआधी तब्बल 52 वर्षांपूर्वी म्हणजेच 1969 मध्ये रॉड लेव्हर याने ही कामगिरी केली होती.

इतर बातम्या

Novak Djokovic इतिहास रचण्यापासून थोडक्यात हुकला?, अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या जेतेपदाला हुलकावणी, डॅनिल मेदवेदेव विजयी

विराट कोहली नेमकं कोणत्या फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडणार?

Ind vs Eng : पाचवी टेस्ट रद्द, इंग्लंड क्रिकोट बोर्डाला 400 कोटींचा फटका, सौरव गांगुली तातडीनं इंग्लंडच्या दौऱ्यावर

(After loosing US open Final Novak Djokovic got frustrated and his video of hammering racket went viral)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.