Chess Game : भारताला ऑलिम्पियाड बुद्धिबळचे यजमानपद, खेळाचं आयोजन चेन्नईत, यंदाची ऑलिम्पियाड भारतासाठी का विशेष?
44 व्या ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचं यजमानपद यंदा भारत भूषवणार आहे. यामुळे क्रीड प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. स्पर्धा चेन्नईत होणार असल्या्नं ''तमिळनाडूसाठी ही अभिमानाची बाब आहे. जगभरातील आघाडीच्या बुद्धिबळपटूंचे चेन्नईत स्वागत'', असं तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
चेन्नई : 44 व्या ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचं (Chess Game) यजमानपद यंदा भारत भूषवणार आहे. यामुळे क्रीड प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. ”भारतातील बुद्धिबळाची राजधानी यंदा 44व्या ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचे यजमानपद भूषवणार असल्याची घोषणा करताना खूप आनंद होत आहे. तमिळनाडूसाठी ही अभिमानाची बाब आहे. जगभरातील आघाडीच्या बुद्धिबळपटूंचे (Chess player) चेन्नईत स्वागत”, असं तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन (CM MK Stalin) यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाला अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने म्हणजेच एआयसीएफनं देखील दुजोरा दिला आहे. ‘एआयसीएफ’नं भारतीय आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ म्हणजेच ‘फिडे’ला 70 कोटी रुपये देण्याची तयारी केल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता भारतासह जगभराचं आणि क्रीडा प्रेमींचं लक्ष या स्पर्धेकडे लागून आहे.
अखेर चेन्नईवर शिक्कामोर्तब
44व्या ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन 26 जुलै ते 8 ऑगस्टमध्ये रशियाची राजधानी मॉस्को येथे आयोजित करण्यात येणार होतं. पण रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी भारताची राजधानी दिल्ली, गुजरात आणि चेन्नई ही , मोठी शहरे चर्चेत होती. मात्र, भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सरचिटणीस भरत सिंह चौहान यांनी प्रशिक्षक श्रीनाथ नारायणन यांच्यासह तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांची भेट घेतली होती. त्यानंतर ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धे तमिळनाडूमध्ये होणार असल्याच्याचं बोललं गेलं. त्यानंतर खुद्द एआयसीएफनं यजमानपदासाठी चेन्नईचं नाव निश्चित केलं.
#ChessOlympiad2022 pic.twitter.com/U2bjZR0U1v
— M.K.Stalin (@mkstalin) March 16, 2022
अभिमानाचा क्षण-विश्वनाथन आनंद
ऑलिम्पियाड ही भारतात होणारी सर्वात मोठी दुसरी जागतिक बुद्धिबळ स्पर्धा ठरणार आहे. कारण, यापूर्वी 2013 मध्ये विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन या मोठ्या खेळाडूंमधील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढत भारतामध्ये झाली होती. त्यानंतर आता चेन्नईत होणारी ऑलिम्पियाड ही भारतात होणारी सर्वात मोठी दुसरी जागतिक बुद्धिबळ स्पर्धा ठरणार आहे. ऑलिम्पियाडमध्ये यजमान म्हणून निवड होणं हा भारतासाठी अभिमानाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी व्यक्त केली आहे.
Thank you sir for making Chennai all about chess ! A proud moment for all of Indian and Chennai chess community. Chennai Chess … always has a nice ring to it. The efforts of @aicfchess and @FIDE_chess in working together so swiftly is to be commended. https://t.co/UB6jIfKW5T
— Viswanathan Anand (@vishy64theking) March 15, 2022
#chennaichessolympiad2022! Vanakam https://t.co/ucfDM8Ojj3
— Viswanathan Anand (@vishy64theking) March 15, 2022
युद्धामुळे स्पर्धा भारतात
एकीकडे राशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. तर दुसरीकडे रशियाबाहेर हलवण्यात आलेल्या ४४व्या ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याचा मान भारताला लाभणार आहे. ही स्पर्धा 26 जुलै ते 8 ऑगस्टमध्ये रशियाची राजधानी मॉस्को येथे आयोजित करण्यात येणार होती. मात्र, युक्रेन आणि रशियातील युद्धामुळे ऑलिम्पियाडसह सर्वच बुद्धिबळ स्पर्धा रशियाबाहेर खेळवण्याचा निर्णय हा ‘फिडे’ म्हणजेच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ घेतला आहे. त्यामुळे ही स्पर्धा चेन्नईत आयोजित करण्यात आली आहे.
इतर बातम्या