Euro Cup 2020 Final : इंग्लंडच्या फॅन्सची गुंडगिरी, पराभवानंतर रागात येऊन इटलीच्या चाहत्यांना मारहाण, Video व्हायरल
इंग्लंड फुटबॉल संघ 55 वर्षांनी युरोच्या चषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. पण इटलीच्या संघाने त्यांना मात देत त्यांचत जेतेपदाचं स्वप्न तोडलं. पण हा पराभव इंग्लंड चाहत्यांना पचला नसल्याने त्यांनी इटली समर्थकांना मारहाण करत लाजीरवाणे काम केले.
लंडन : यूरोपियन देशातील अत्यंत जुनी आणि मानाची स्पर्धा असणाऱ्या युरो चषक स्पर्धेच्या (Euro Cup 2020) अंतिम सामन्यात 55 वर्षांनंतर जागा मिळवणाऱ्या इंग्लंडने (England) सर्वांचीच मनं जिंकली होती. अत्यंत चुरशीच्या सामन्यात दोन्ही संघ केवळ 1-1 गोल करु शकले. त्यामुळे पेनल्टी शूटआऊटने सामन्याचा निकाल काढण्यात आला. ज्यात 3-2 ने इंग्लंड पराभूत झाला. असे असतानाही इंग्लंडने दिलेल्या कडव्या झुंजीचे सर्वचजण कौतुक करत होते. पण इंग्लंडच्या चाहत्यांनी या संपूर्ण सामन्याला गालबोट लावण्याचे काम केले. सामन्यात पराभवानंतर नाराज इंग्लंड फॅन्सनी (England Fans) इटली समर्थकांना हाणामारी केली. (Euro 2020 After Italy Beat England in penalty England Fans Hooliganism against italy Fans at Wembley Stadium)
लंडनच्या ऐतिहासिक वेम्बली स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या युरो चषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या खेळाडूंकडू खेळाडू वृत्तीचे दर्शन घडले. सामन्यात जास्त फाऊल झाले नाहीत तसेच पराभवानंतरही इंग्लंडच्या खेळाडूंनी खेळकर वृत्तीने पराभव पत्करला. पण सामन्यानंतर इंग्लंड फॅन्सनी मात्र लाजिरवाणी कृती केली. त्यांनी सामना सुरु असताना इटलीच्या संघाने पेनल्टी मिस करताच वर्णभेदी शिविगाळ केला. पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा सामना संपल्यानंतर त्यांनी सरासर गुंडगिरी केली. त्यांनी मैदानातून बाहेर निघताना इचली फॅन्सना हाणामारी करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर व्हायरल पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडीओमध्ये इंग्लंडचे फॅन्स इटली समर्थकांना लाथा-बुक्यांनी मारताना दिसत आहेत.
The English team has won hearts but their fans (or a section of them) have been an absolute disgrace. Online racist abuse of their players who missed penalties, booing the opponents national anthem and downright hooliganism against Italian fans .. shameful. ? pic.twitter.com/o768lQNfKu
— Rajdeep Sardesai (@sardesairajdeep) July 12, 2021
गोलकिपरने तारले इटलीला
सामन्यात सुरुवातीला दुसऱ्याच मिनिटाला इंग्लंडच्या ल्यूक शॉ (Luke Shaw) याने गोल करत इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 67 व्य़ा मिनिटाला इटलीच्या लियोनार्डो बोनूची (Leonardo Bonucci) याने गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर 90 मिनिटे होऊन अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे विजेता कोण हे निश्चित करण्यासाठी पेनल्टी शूटआऊट घेण्यात आले. पेनल्टी शूटआउटमध्ये सुरुवातीला इटलीच्या डॉमेनिको बेरार्डीने पहिला गोल केला. त्यानंतर इंग्लंडच्या कर्णधार हॅरी केनने देखील अप्रतिम गोल दागत बरोबरी साधली. त्यानंतर इटलीच्या अँड्रिया बेलोट्टीकडून गोल हुकला तेव्हाच इंग्लंडच्या हॅरी मॅग्युरेने गोल केला. त्यामुळे इंग्लंडने 2-1 ची आघाडी घेतली. त्यानंतर इटलीच्या लेओनार्डो बोनुचीने गोल करत स्कोर 2-2 केला. त्यानंतर मात्र इंग्लंडचा स्टार युवा खेळाडू रॅशफोर्ड गोल करण्यास हुकला आणि इंग्लंडवर दडपण आले. इटलीकडून फेडेरिकोने गोल करत इटलीला 3-2 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर इंग्लंडचा सँचोसचा गोल इटलीचा गोलकिपर डोनरमा याने अडवला. त्यानंतर इटलीच्या जॉर्जिओचा गोल इंग्लंडच्या गोलकिपरने अडवत सामना सुरु ठेवला. पण अखेर इंग्लंडच्या बुकायो साका याने मारलेली पेनल्टी किक अप्रतिम रित्या इचलीचा गोलकिपर डोनरमाने अडवली आणि अटीतटीच्या सामन्यात इटलीला विजय मिळवून दिला.
हे ही वाचा :
EURO 2020 : इंग्लंडची कडवी झुंज अपयशी, युरो चषक इटलीच्या नावे!
EURO 2020 स्पर्धेची दिमाखात सांगता, ‘या’ खेळाडूला मिळाला गोल्डन बूट
(Euro 2020 After Italy Beat England in penalty England Fans Hooliganism against italy Fans at Wembley Stadium)