Tokyo Olympics साठी मेरी कोमने कसली कंबर, भारतात नाही तर ‘या’ देशात करणार सराव, वाचा कारण काय?

भारताची बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम टोक्यो ऑलम्पिकसाठी सज्ज झाली असून तिने कसून सराव करण्यास सुरुवात केली आहे. पण सरावासाछी तिने भारत नाही तर वेगळा देश निवडला आहे त्याचं कारणही वेगळं आहे.

Tokyo Olympics साठी मेरी कोमने कसली कंबर, भारतात नाही तर 'या' देशात करणार सराव, वाचा कारण काय?
मेरी कोम
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 7:27 PM

नवी दिल्ली : टोक्यो ऑलम्पिक 2021 (Tokyo Olympics 2021) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व देशांतील खेळाडू या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी तयारी करत आहेत. विविध देशांमध्ये ऑलिम्पिकसाठी पात्रता फेऱ्याही सुरु आहेत. भारतातही ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी खेळाडू कसून सराव करत आहेत. दरम्यान भारताला पदक मिळवून देण्याची सर्वांत जास्त आशा असणाऱ्या बॉक्सिंग चॅम्पियन एमसी मेरी कोमने (MC Marykom) देखील तयारीला सुरुवात केली आहे. (For Tokyo Olympics 2021 MC Mary Kom Will Practice in Italy Instead of India)

लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेता मेरी कोम सध्यातरी  पुण्याच्या सेना खेल संस्थानात सराव करत आहे.  मागील वर्षी कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेली टोक्यो ऑलिम्पिक यंदा पार पडणार असल्याने मेरीने या स्पर्धेसाठी संपूर्ण तयारी केली असून लवकरच ती सरावासाठी इटलीला रवाना होणार आहे.

कार्यक्रमात बदल

मेरी कोमने पीटीआयला दिलेल्या माहितीत सांगितले की, ‘‘मी ऑलिम्पिकला रवाना होण्याच्या कार्यक्रमात काहीसा बदल केला आहे. मी भारतातून थेट टोक्योला जाणार नसून आधी इटलीला रवाना होऊन तेथे सराव केल्यानंतर ऑलिम्पिकसाठी रवाना होणार आहे. भारतातून गेल्यानंतर विलगीकरणात राहावे लागते ज्यामुळे सरावाची लय तुटेल आणि तोटा होईल या कारणाने मी आधी इटलीला सराव करणार आहे. ’’

सोबत असणार प्रशिक्षक आणि फिजियो

मेरी कोमसोबत तिचे खाजगी प्रशिक्षक छोटे लाल यादव आणि फिजियो देखील असणार आहेत. दरम्यान जपान सरकारने भारतीय खेळाडू आणि अधिकारी जे ऑलिम्पिकसाठी टोक्योला येणार आहेत, त्यांना एकआठवड्याभरापासून दररोज कोविड-19 टेस्ट करण्याची सूचना दिली आहे. तसेच टोक्योत आगमनानंतरही विलगीकरणात राहण्याचे संदेश दिले आहेत. भारतासह अन्य 10 देशांसाठी असे कडक नियम लागू करण्यात आले आहे.

हे ही वाचा :

Tokyo Olympics पूर्वी भारताला झटका, सर्वोत्कृष्ट धावपटूला दुखापत

Tokyo Olympics : साजन प्रकाशचं घवघवीत यश, ऑलम्पिकसाठी पात्र होणारा पहिला भारतीय जलतरणपटू, वाचा कशी मिळाली पात्रता

Photo : टोक्यो ऑलिम्पिक 2021 मधून ‘या’ दिग्गज टेनिसपटूंची माघार, प्रत्येकाची कारण वेगवेगळी

(For Tokyo Olympics 2021 MC Mary Kom Will Practice in Italy Instead of India)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.