Copa America : मेस्सीचा एका मागोमाग एक गोल, अर्जेंटीनाचा बोलिवियावर दमदार विजय, पाहा VIDEO

मेस्सी कर्णधार असलेल्या अर्जेंटीना संघाने बोलिवियावर 4-1 च्या दमदार फरकाने विजय मिळवला. या विजयासह अर्जेंटीना पुढील फेरीत पोहचली असून सामन्यातील दोन गोल हे एकट्या मेस्सीने केले.

Copa America : मेस्सीचा एका मागोमाग एक गोल, अर्जेंटीनाचा बोलिवियावर दमदार विजय, पाहा VIDEO
गोल केल्यानंतर सहखेळाडूंसोबत आनंद व्यक्त करताना मेस्सी
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 7:29 PM

ब्राझीलिया : अमेरिकी देशांत सुरु असलेल्या कोपा अमेरिका चषक स्पर्धेत (Copa America Cup) लिओनल मेस्सी (Lionel Messi) कर्णधार असलेल्या अर्जेंटीना संघाने (Argentina) आपली अप्रतिम कामगिरी कायम ठेवत बोलिविया (Bolivia) संघावर 4-1 च्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. तिकडे युरो चषकात ख्रिस्तियानो रोनाल्डोचा (Cristiano Ronaldo) पोर्तुगाल (Portugal) संघ स्पर्धेतून बाहेर गेल्याने रोनाल्डोचा खेळ पाहायला मिळणार नाही. मात्र कोपा अमेरिका स्पर्धेत मेस्सीची जादू कायम असून बोलविया विरुद्धही मेस्सीने दोन गोल दागल्याने अर्जेंटीनाने विजय मिळवला. (In Copa America Argentina vs Bolivia Match Messi did two goals And Argentina Won)

कायम म्हटले जाते की फुटबॉल हा एक सांघिक खेळ असून सर्व खेळाडूंच्या चांगल्या खेळानेच सामन्यात विजय मिळवता येतो. हे शत प्रतिशत खरे असले तरी एक उत्कृष्ठ खेळाडूही संघाचे भवितव्य बदलू शकतो हेही तितकेच खरे आहे. याची काही उदाहरण म्हणजे रोनाल्डो, मेस्सी, ल्युका मॉर्डीच. त्यात मॉर्डीचचा संघ क्रोएशिया आणि रोनाल्डोचा पोर्तुगाल युरो चषकातून बाहेर गेले असले तरी मेस्सीचा अर्जेंटीना अजूनही कोपो अमेरिका खेळत असल्याने अनेक फुटबॉल प्रेमींचे लक्ष अर्जेंटीनाच्या सामन्यांवर लागून आहे.

मेसीची जादू आणि अर्जेंटीना विजयी

अर्जेंटीना आणि बोलिविया यांच्यात झालेल्या सामन्यात सुरुवातीपासूनच अर्जेंटीना संघाचे वर्चस्व होते. सामना सुरु होताच 5 व्या मिनिटाला मेस्सीच्या असिस्टवर गोम्स याने अप्रतिम गोल करत सामन्यात 1-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर 34 व्या मिनिटाला अर्जेंटीनाला मिळालेल्या पेनल्टीवर मेस्सीने अप्रतिम गोल केला. त्यानंतर लगेचच 41 व्या मिनिटाला मेस्सीने पुन्हा आपला जलवा दाखवत उत्कृष्ट गोल करत सामन्यात 3-0 ची आघाडी घेतली. ज्यानंतर 59 व्या मिनिटाला बोलिवियाच्या सेवेड्रोने एक गल केला. मात्र 5 मिनिटांतच अर्जेंटीनाच्या मार्टीनेजने आणखी एक गोल करत संघाला 4-1 ने विजय मिळवून दिला.

क्वाॉर्टर फायनलमध्ये इक्वाडोरशी लढत

या विजयापूर्वीच अर्जेंटीनाचा संघ क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचला होता. त्यामुळे बोलिविया विरुद्धचा विजयाने त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. आता अर्जेंटीनाची लढत क्वॉर्टर फायनलमध्ये इक्वाडोर संघाशी होणार आहे.

हे ही वाचा :

Euro 2020 : रोमहर्षक सामन्यात स्पेनचा विजय, क्रोएशियाला नमवत नवा रेकॉर्डही केला नावे

Euro 2020 : रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ पराभूत, स्पर्धेतून बाहेर, मैदानावर रोनाल्डोसह प्रतिस्पर्धीही भावूक

Lionel Messi Birthday : दहाव्या वर्षी उपचारासाठी मदत, 20 वर्षांपासून तोच संघ, कोट्यवधींच्या ऑफर्स धुडकावल्या

(In Copa America Argentina vs Bolivia Match Messi did two goals And Argentina Won)

पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.