Copa America : मेस्सीचा जादूई गोल, अर्जेंटीना इक्वाडोरवर विजय मिळवत सेमीफायनलमध्ये दाखल

कोपा चषकाच्या उपांत्य पूर्व फेरीत मेस्सी कर्णधार असलेल्या अर्जेंटीना संघाने इक्वाडोरवर 3-0 च्या दमदार फरकाने विजय मिळवला. या विजयासह अर्जेंटीना सेमीफायनलमध्ये पोहचली आहे.

Copa America : मेस्सीचा जादूई गोल, अर्जेंटीना इक्वाडोरवर विजय मिळवत सेमीफायनलमध्ये दाखल
अर्जेंटीना विरुद्ध इक्वाडोर सामन्यात फ्री किक घेताना लिओनल मेस्सी
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 1:55 PM

ब्राझीलिया : अमेरिकी देशांत सुरु असलेल्या कोपा अमेरिका चषक स्पर्धेत (Copa America Cup) लिओनल मेस्सी (Lionel Messi) कर्णधार असलेल्या अर्जेंटीना संघाने (Argentina) आपली धमाकेदार कामगिरी कायम ठेवत इक्वाडोरवर (Ecuador)  3-0 च्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यातील विजयापेक्षा जास्त चर्चा मेस्सीने दागलेल्या एका अप्रतिम फ्रि किक गोलची आहे. मेस्सीच्या कारकिर्दीतील 58 व्या फ्रि किक गोलचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या विजयासह अर्जेंटीना सेमीफायनलमध्ये देखील पोहचली असून सेमी फायनलमध्ये अर्जेंटीना कोलंबियाशी भिडणार आहे. (In Copa America Argentina vs ecuador Match Messis Super Free Kick And Argentina Won)

सामन्यात सुरुवातीपासून अर्जेंटीनाचे वर्चस्व होते. पण त्यांना पहिले यश मिळवायला 40 मिनिटे वाट पाहावी लागली. अखेर 40 व्या मिनिटाला रॉड्रिगो डी पॉलने पहिला गोल करत अर्जेंटीनाला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर थेट 84 व्या मिनिटाला लौटारो मार्टिनेजने आणखी एक गोल करत अर्जेंटीनाचा विजय पक्का केला. पण त्यानंतर अधिकच्या वेळेत कर्णधार लिओनल मेस्सीने केलेल्या गोलने सर्वांनाच हैराण करु सोडले.

मेस्सीची जादू चालली…

सामना पूर्ण झाल्यानंतर अधिक मिळालेल्या वेळेत 93 व्या मिनिटावर मेस्सीने यंदाच्या कोपा अमेरिका स्पर्धेतील एक अप्रतिम गोल दागला. प्रतिस्पर्धी खेळाडूंची भिंत समोर उभी ठाकली असतानाही बॉलला अप्रतिम वलय देत मेस्सीने फुटबॉल थेट गोलपोस्टमध्ये धाडला. दरम्यान या गोलची जादू सर्व सोशल मीडियावर झाली असून सर्वजण या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

हे ही वाचा :

Euro 2020 : युक्रेनला मात देत इंग्लंड विजयी, चेक रिपब्लिकला नमवत डेन्मार्कही सेमीफायनलमध्ये दाखल

Copa America : मेस्सीचा एका मागोमाग एक गोल, अर्जेंटीनाचा बोलिवियावर दमदार विजय, पाहा VIDEO

Euro 2020 : रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ पराभूत, स्पर्धेतून बाहेर, मैदानावर रोनाल्डोसह प्रतिस्पर्धीही भावूक

(In Copa America Argentina vs ecuador Match Messis Super Free Kick And Argentina Won)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.