Euro 2020: फिनलँडचा ऐतिहासिक विजय, वेल्स आणि स्वित्झर्लंडमधील सामना अनिर्णीत, बेल्जियमची रशियावर मात

12 जून रोजी युरो चषकात ती सामने खेळवले गेले. तिन्ही सामने चुरशीचे झाले. ज्यातील एक सामना अनिर्णीत राहिला.

Euro 2020: फिनलँडचा ऐतिहासिक विजय, वेल्स आणि स्वित्झर्लंडमधील सामना अनिर्णीत, बेल्जियमची रशियावर मात
बेल्जियम विरुद्ध रशिया सामन्यातील एक क्षण
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 12:41 PM

कोपेनहेगन : यूरो चषक 2020 (Euro Cup 2020) स्पर्धेला सुरु होऊन दोन दिवसच झाले असले, तरी अत्यंत चुरशीचे सामने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. 12 जून रोजी देखील तीन सामने खेळवले गेले ज्यातील एक सामना अनिर्णीत सुटला. तर डेन्मार्क आणि बेल्जियम यांच्यातील सामन्यादरम्यान डेन्मार्कचा ख्रिस्टियन एरिक्सन (Christian Eriksen) मैदानातच कोसळला ज्यामुळे काही काळ सामना थांबवण्यात आला होता. मात्र नंतर परिस्थिती ठिक होताच सामना सुरु करण्यात आला. (In Euro 2020 Wales vs Switzerland Match draw Finland Beats Denmark Romelu Lukaku led Belgium to Win Against Russia)

शनिवारी दिवसभरात फिनलँड विरुद्ध डेन्मार्क (Finland vs Denmark), बेल्जियम विरुद्ध रशिया (Belgium vs Russia) आणि वेल्स विरुद्ध स्वित्झर्लंड (Wales vs Switzerland) या तीन संघात सामने खेळवण्यात आले. यात फिनलँडने 1-0 ने डेन्मार्कवर विजय मिळवला. तर बेल्जियमने रोमेलु लुकाकुच्या दोन गोल्सच्या जोरावर रशियाला 3-0 ने पछाडले. तर वेल्स आणि स्वित्झर्लंडमधील सामना 1-1 गोल्सवर अनिर्णीत सुटला.

पहिला सामना अनिर्णीत

दिवसातील पहिला सामना वेल्स आणि स्वित्झर्लंड यांच्यात पार पडला. ज्यात स्वित्झर्लंडच्या ब्रील एम्बोलोने 49 व्या मिनिटाला गोल करत संघाला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 74 व्या मिनिटाला कीफर मूर याने जो मोरेलच्या क्रॉसवर गोल करत सामन्यात बरोबरी साधली. ज्यानंतर दोन्ही संघाना एकही गोल करता न आल्याने दोन्ही संघाना 1-1 गुण देण्यात आला.

फिनलँडचा ऐतिहासिक विजय

दिवसातील दुसऱ्या सामन्यात डेन्मार्क आणि फिनलँड आमने-सामने होते. पण याच सामन्यात एक घटना अशी घडली ज्यामुळे सर्वचजण घाबरून गेले. डेन्मार्कचा दिग्गज मिडफिल्डर ख्रिस्टियन एरिक्सन (Christian Eriksen) अचानक मैदानावर बेशुद्ध पडला. ज्यामुळे सामना काही काळ स्थगित करण्यात आला होता. सध्या एरिक्सनची प्रकृती स्थिर असून काही वेळातच उर्वरीत सामना खेळवला गेला. ज्यात फिनलँडच्या पोहयानपालो याने केलेल्या एकमेव गोलच्या मदतीने सामना फिनलँडने खिशात टाकला. संपूर्ण सामन्यात डेन्मार्कचा दबदबा असूनही एकही गोल न करता आल्याने फिनलँडने उत्कृष्ट विजय मिळवला. फुटबॉलच्या इतक्या मोठ्या स्पर्धेतील फिनलँडचा हा पहिलाच विजय होता.

बेल्जियमच्या विजयात चमकला लुकाकु

बेल्जियमचा स्टार खेळाडू रोमेलू लुकाकु (Romelu Lukaku) याच्या दोन गोल्सच्या जोरावर बेल्जियमने रशियाला 3-0 ने पछाडले. लुकाकुसह बदली खेळाडू म्हणून आलेल्या थॉमस म्यूनियरने देखील एख गोल केला. दरम्यान रशियाला एकही गोल करता न आल्याने सामन्यात बेल्जियमने 3-0 च्या फरकाने विजय मिळवला.

हे ही वाचा :

UEFA EURO 2020 | सामन्यादरम्यान डेन्मार्कचा दिग्गज फुटबॉलपटू मैदानातच कोसळला, बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल, सामना स्थगित

UEFA EURO 2020 | सामन्यादरम्यान डेन्मार्कचा दिग्गज फुटबॉलपटू मैदानातच कोसळला, बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल, सामना स्थगित

IND vs SL : भारताचा श्रीलंका दौरा, सलामीला कोण उतरणार?, मधल्या फळीत कुणाला संधी? पाहा…

(In Euro 2020 Wales vs Switzerland Match draw Finland Beats Denmark Romelu Lukaku led Belgium to Win Against Russia)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.