लंडन : ऐतिहासिक वेम्बली मैदानात युरो चषकाचा (Euro Cup 2020) सेमी फायनलचा सामना इंग्लंड आणि डेन्मार्क (England vs Denmark) या दोन संघामध्ये पार पडला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्य़ा सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने (Harry Kane) नावाला साजेशी खेळी करत अतिरिक्त वेळेत निर्णायक गोल लगावला. ज्याच्या मदतीने इंग्लंडने 2-1 च्या फरकाने सामना खिशात घालत अंतिम सामन्यात धडक घेतली. इतिहासात पहिल्यांदाच युरो चषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने अशी कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे 1966 नंतर पहिल्यांदाच अशा मोठ्या स्पर्धेत इंग्लंड अंतिम सामन्यात पोहोचली आहे. अंतिम सामन्यात इंग्लंडसमोर इटलीचे आव्हान असेल. (In Euro Cup England Win over Denmark in Semi Final and enters in Finals With Italy)
? The EURO 2020 final is set!
?????????? Italy versus England at Wembley Stadium on Sunday ?
Who is lifting the ?❓#EURO2020 pic.twitter.com/tYSEzNjAkI
— UEFA EURO 2020 (@EURO2020) July 7, 2021
यंदाच्या युरो चषकात आपल्या खेळाने सर्वांनाच आश्चर्यचकीत कऱणाऱ्या डेन्मार्क संघाचा प्रवास जरी संपला असला तरी संपूर्ण स्पर्धेसह सेमी फायनमध्येही त्यांनी कडवी झुंज दिली. सुरुवातीला अप्रतिम खेळ दाखवत डेन्मार्कने 30 व्या मिनिटाला पहिला गोल दागला. डेन्मार्कच्या मिकेल डेम्सगार्डने (Mikkel Damsgaard) शानदार गोल करत संघाला 1-0 ची आघाडी मिळून दिली. त्यानंतर लगेचच 39 व्या मिनिटाला इंग्लंडकडून आक्रमन करण्यात आले. कर्णधार केनने रहीम स्टर्लिंगला (Raheem Sterling) पास दिला पण बॉल थांबवण्यासाठी डेन्मार्कचा कर्णधार साइमन कियर (Simon Kjær) मध्ये आला आणि चूकून बॉल त्याच्यांच गोलमध्ये गेल्याने सामन्यात स्कोर 1-1 झाला.
पहिल्या हाल्फनंतर 1-1 स्कोर असताना दुसऱ्या संपूर्ण हाल्फमध्ये इंग्लंडला एकही गोल करता आला नाही. दोनही संघानी काही प्रयत्न केले पण यश मिळाले नाही. अखेर 90 मिनिटं झाल्यानंतर अतिरिक्त वेळ देण्यात आला. त्यावेळ 103 व्या मिनिटाला इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनला डेन्मार्कच्या एका चूकीमुळे पेनल्टी मिळाली. तिचा वापर करत त्याने गोल करण्याचा प्रयत्न केला पण डेन्मार्कच्या गोलकिपरने गोल रोखला खरा पण बॉलला हातात ठेवू न शकल्याने केनने पुन्हा किक करत बॉल गोलपोस्टमध्ये टाकला 2-1 ने संघाला विजय मिळवून दिला.
MATCH REPORT: Harry Kane steers England to first major final since 1966…
??????? Player of the tournament for the Three Lions is ______#EURO2020 | #ENG
— UEFA EURO 2020 (@EURO2020) July 7, 2021
याआधी सेमीफायनलच्या दुसऱ्या लढतीत इटलीने चुरशीच्या झालेल्या सामन्यात स्पेनला (Italy vs Spain) मात देत अंतिम सामना गाठला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात दोन्ही संघानी 1-1 गोल केला. त्यामुळे विजयी कोण हे ठरवण्यासाठी पेनल्टी शूटआऊट घेण्यात आले, ज्यात इटलीने 4-2 च्या फरकाने विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला. त्यामुळे आता इंग्लंड विरुद्ध इटली (England vs Italy) असा युरो चषकाचा अंतिम सामना रंगणार आहे.
Crown your EURO 2020 winner! ??@GazpromFootball | #EUROPredictor | #EURO2020
— UEFA EURO 2020 (@EURO2020) July 7, 2021
हे ही वाचा :
Euro 2020 : 13 वर्षांपूर्वीचा बदला घेत इटलीची स्पेनवर मात, अंतिम सामन्यात इटली दिमाखात दाखल
Euro 2020 : युक्रेनला मात देत इंग्लंड विजयी, चेक रिपब्लिकला नमवत डेन्मार्कही सेमीफायनलमध्ये दाखल
(In Euro Cup England Win over Denmark in Semi Final and enters in Finals With Italy)