Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Euro 2020 : रोमहर्षक सामन्यात स्पेनचा विजय, क्रोएशियाला नमवत नवा रेकॉर्डही केला नावे

युरो चषक स्पर्धेत आता बाद फेरीचे सामने सुरु आहेत. दरम्यान सोमवारी स्पेन आणि क्रोएशिया यांच्यात झालेला सामना अत्यंत उत्कंटावर्धक झाला. एका मागून एक गोल होत असताना अखेर स्पेनने 5-3 च्या फरकाने विजय मिळवला.

Euro 2020 : रोमहर्षक सामन्यात स्पेनचा विजय, क्रोएशियाला नमवत नवा रेकॉर्डही केला नावे
विजयानंतर जल्लोष करताना स्पेनचे खेळाडू
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 12:06 PM

कोबेनहवन : युरोपियन देशात सुरु असलेली युरो चषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहचली असून सध्या बाद फेरीचे सामने सुरु आहेत. रविवारी रोनाल्डो कर्णधार असलेला पोर्तुगालचा संघ स्पर्धेबाहेर गेल्यानंतर सोमवारचा स्पेन आणि क्रोएशिया या तुल्यबळ संघातील सामनाही चांगलाच चुरशीचा झाला. एकामागोमाग एक गोल होत असताना अधिकच्या वेळेत स्पेनने दोन अधिक गोल करत सामना आपल्या नावे केला. या विजयासह स्पेनचा संघ क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचला आहे. विशेष म्हणजे सामन्यात स्पेनने 5 गोल केल्याने युरो चषकाच्या सलग दुसऱ्या सामन्यात 5 गोल करण्याचा विक्रमही त्यांनी आपल्या नावे केला आहे. (In round 16 match of Euro 2020 Spain defeated Croatia by 5-3 And enters in Quarter Final)

स्पेनने क्रोएशियाला 5-3 च्या फरकाने पराभूत केले असले तरी हे करणे स्पेनसाठी तितके सोपे नव्हते. सामन्याच्या पहिल्या 45 मिनिटांत म्हणजेच हाल्फ टाईमपर्यंत स्कोर 1-1 होता. दोघांकडून चुरशीची टक्कर देण्यात येत होती. मात्र पहिल्या हाल्फमध्ये दोघांनीही समान गोल केले असल्याने पुढील 45 मिनिटांत सामन्याचा निर्णय होणार होता.

आधी स्पेनचा अॅटॅक

पहिला हाल्फ 1-1 च्या बरोबरीत सुटल्यानंतर स्पेनने गिअर अप करत क्रोएशियावर हल्ला करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 57 व्या मिनिटालाच दुसरा गोल करत स्पेनने सामन्यात 2-1 ची आघाडी घेतली. क्रोएशियाकडूनही गोल करण्याचा प्रयत्न सुरुच होता. तेवढ्यातच स्पेनने पुन्हा एक संधी साधत 75 व्या मिनिटाला आणखी एक गोला केला आणि 3-1 ची आघाडी घेतली.  स्पेनने 2 अधिक गोलची आघाडी घेतल्याने सामना स्पेनच्या पारड्यात झुकताना दिसत असतानाच क्रोएशियाने पलटवार केला.

क्रोएशियाच्या दमदार कमबॅक

स्पेनने 3-1 ची आघाडी घेतल्यानंतर क्रोएशियाने पलटवार करत 85 व्या मिनटाला गोल केला. लगेचच 90 व्या मिनटाला आणखी एक गोल करत क्रोएशियाने सामन्यात बरोबरी साधली. दोन्ही संघ समान स्कोरवर असल्याने सामना खेळवण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आली. अतिरिक्त वेळेमध्ये दोन्ही संघ एकमेंकाच्या गोलपोस्टवर हल्ला करु लागले.

स्पेनने शेवटचे वार करत मिळवला विजय

एक्सट्रा टाइममध्ये स्पेनचा स्टार स्ट्राईकर मोराटाने 100 व्या मिनिटाला आणि ओएराझीबेलने 103 व्या मिनटाला गोल करत स्पेनला 5-3 ची आघाडी मिळवून दिली. ज्यानंतर क्रोएशियाला एकही पलटवार करता आला नाही. त्यामुळे या चुरशीच्या सामन्यात अखेर स्पेनचा विजय झाला. स्पेन या विजयासह क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचला आहे.  तिकडे फ्रान्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये नमवत स्वित्झर्लंडने ही क्वॉर्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे 2 जुलैला हे दोन्ही संघ क्वॉर्टर फायनलचा सामना खेळतील.

हे ही वाचा :

Euro 2020 : रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ पराभूत, स्पर्धेतून बाहेर, मैदानावर रोनाल्डोसह प्रतिस्पर्धीही भावूक

Euro 2020 : रोनाल्डो ठरला Successful, एकाच सामन्यात चार दमदार विक्रम नावावर

Euro 2020 : रोनाल्डोच्या विक्रमाने पोर्तुगालची विजयी सुरुवात, जर्मनी मात्र फ्रान्सकडून पराभूत

(In round 16 match of Euro 2020 Spain defeated Croatia by 5-3 And enters in Quarter Final)

संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.
राणेंनी आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली, 'त्याला आधी कंठ तरी फुटू दे...'
राणेंनी आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली, 'त्याला आधी कंठ तरी फुटू दे...'.
राडा, जाळपोळ.. अन् तणावपूर्ण शांतता; नागपुरात 11 ठिकाणी संचारबंदी
राडा, जाळपोळ.. अन् तणावपूर्ण शांतता; नागपुरात 11 ठिकाणी संचारबंदी.
मुख्यमंत्र्यांचा नागपूरच्या जखमी पोलिसांना व्हिडिओ कॉल
मुख्यमंत्र्यांचा नागपूरच्या जखमी पोलिसांना व्हिडिओ कॉल.
फडणवीसांची पहिल्यांदाच नितेश राणेंना तंबी, 'त्या' विधानावरून फटकारलं
फडणवीसांची पहिल्यांदाच नितेश राणेंना तंबी, 'त्या' विधानावरून फटकारलं.
'राणेंना महाराष्ट्र जाळायचाय का?', महिला खासादारानं थेट सवाल करत झापल
'राणेंना महाराष्ट्र जाळायचाय का?', महिला खासादारानं थेट सवाल करत झापल.
खोक्याला शिरूर कासार पोलीस ठाण्यातून हलवलं
खोक्याला शिरूर कासार पोलीस ठाण्यातून हलवलं.
'फडणवीसांनी तुमची जीभ छाटली की..'; औरंगजेबाशी तुलना अन् शिंदेंचा संताप
'फडणवीसांनी तुमची जीभ छाटली की..'; औरंगजेबाशी तुलना अन् शिंदेंचा संताप.
नागपुरातील राड्यानंतर शिंदेंनी काँग्रेसच्या नेत्यांना धारेवर धरलं
नागपुरातील राड्यानंतर शिंदेंनी काँग्रेसच्या नेत्यांना धारेवर धरलं.
'या' राजकीय पक्षाला मोठा धक्का, माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार
'या' राजकीय पक्षाला मोठा धक्का, माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार.