Wimbledon 2021 : सलामीच्या सामन्यात जोकोव्हीच विजयी, तर त्सित्सिपासचा पराभव
टेनिस विश्वातील एक मानाची स्पर्धा असणारी विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे रद्द झाली होती. यंदा मात्र सर्व काळजी घेऊन इंग्लंडमध्ये स्पर्धेला पुन्हा सुरुवात करण्यात आली असून सलामीच्या सामन्यांपासूनच चुरस दिसून येत आहे.
लंडन : कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी रद्द झालेल्या विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेची (Wimbledon 2021) इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. नुकताच फ्रेंच ओपनचा खिताब पटकावलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हीचने (Novak Djokovic) सलामीच्या सामन्यात विजय मिळवत आपली यशस्वी कारकिर्द कायम ठेवली आहे. मात्र दुसरीकडे फ्रेंच ओपनमध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासला (Stefanos Tsitsipas) पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. (In Wimbledon 2021 Novak Djokovic Won his First Match Where Stefanos Tsitsipas Lost)
नोव्हाक जोकोव्हीच विरुद्ध जॅक ड्रॅपर
नुकतीच फ्रेंच ओपन जिंकल्यानंतर जागतिक क्रमवारीत ही अव्वल स्थानी पोहोचलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने ब्रिटनच्या जॅक ड्रॅपरला चार सेट्समध्ये नमवत विजय मिळवला. पहिली फेरी जॅकने 4-6 च्या फरकाने जिंकली. त्यानंतर मात्र नोव्हाकने पलटवार करत 6-1, 6-2 आणि 6-2 च्या फरकाने तिन्ही फेऱ्या जिंकत सामना आपल्या नावे केला. या विजयासह नोव्हाकने पुढील फेरीत मजल मारली आहे.
A game of aces in 46 seconds ⏱
On your marks. Get set. Go, @DjokerNole…#Wimbledon pic.twitter.com/Pjj0wnjiL5
— Wimbledon (@Wimbledon) June 28, 2021
फ्रान्सेस टिआफोए विरुद्ध स्टेफानोस त्सित्सिपास
फ्रेंच ओपनमध्ये नोव्हसोबत अंतिम फेरीत पोहोचलेल्या ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासला अमेरिकेच्या फ्रान्सेस टिआफोएने तीन सेट्समध्ये नमवत विजय मिळवला. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत 6-4 आणि तिसऱ्या फेरीत 6-3 च्या फरकाने विजय मिळवत टिआफोएने सामना आपला नावे केला. याआधी 2019 मध्येही त्सित्सिपासला पहिल्याच लढतीत पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान 2020 मध्ये मात्र कोरोनाच्या साथीमुळे विम्बल्डन स्पर्धा रद्द करण्यात आली होती.
The biggest win of his career ?
Frances Tiafoe notches a stunning victory over Stefanos Tsitsipas, 6-4, 6-4, 6-3 #Wimbledon pic.twitter.com/4t5k6M0Hri
— Wimbledon (@Wimbledon) June 28, 2021
हे ही वाचा –
Photo : टोक्यो ऑलिम्पिक 2021 मधून ‘या’ दिग्गज टेनिसपटूंची माघार, प्रत्येकाची कारण वेगवेगळी
(In Wimbledon 2021 Novak Djokovic Won his First Match Where Stefanos Tsitsipas Lost)