2022 कॉमनवेल्थ गेम्समधून भारतीय हॉकी संघाची माघार, ‘या’ कारणामुळे घेतलं नाव मागे
नुकतंच भारतीय पुरुष हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत कांस्य पदकावर नाव कोरले. महिला संघानेदेखील ऑलिम्पिक स्पर्धेत उत्तम कामगिरी केली होती.
मुंबई: भारतीय हॉकी संघाने (Indian Hockey Teams) आगामी बर्मिंघम 2022 कॉमनवेल्थ गेम्समधून (Birmingham 2022) नाव मागे घेतलं आहे. कोरोनाचं संकट आणि विलगीकरण तसेच बायोबबलचे नियम या सर्वांमुळे हा निर्णय़ घेतला आहे. ब्रिटेनमध्ये कोणत्याही बाहेरील व्यक्तीला 10 दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण करावा लागतो. त्यामुळे भारतीय महिला आणि पुरुष हॉकी संघ ब्रिटनच्या बर्मिंघम येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ खेळांमधून कोरोनासंबधी नियमांमुळे माघार घेत आहे.
यूरोप खंडात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव इंग्लंडमध्ये असल्याचे सांगत हॉकी इंडियाने दिलेल्या माहितीत सध्या पहिलं लक्ष्य आशियाई खेळ असून तेच 2024 च्या पॅरीस ऑलिम्पिकसाठी पात्रता स्पर्धाही आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष्य देणंही महत्त्वाचं आहे. दरम्यान कॉमनवेल्थ खेळ 2022 मध्ये 28 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान होणार आहेत. तर चीनच्या हांग्जो येथे 10 सप्टेंबरपासून आशियाई खेळ खेळवले जाणार आहेत. या दोघांमध्ये अधिक कालावधी नसल्यानेही हा निर्णय हॉकी संघाने घेतला आहे.
इंग्लंडचीही विश्वचषकातून माघार
कोविड-19 च्या संकटामुळे भारताने बर्मिंघममधील कॉमनवेल्थ खेळातून माघार मंगळवारी (5 ऑक्टोबर) माघार घेतली आहे. दरम्यान हीच कारणं देत एकदिवस आधीच इंग्लंडने देखील आगामी पुरुष हॉकी विश्वचषक जो भारतातील भुवनेश्वर येथे होणार आहे. त्यातून माघार घेतली आहे.
इंग्लंडमध्ये विलगीकरणाचे कठोर नियम
हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निंगोबम यांनी दिलेल्या माहितीत ते म्हणाले, ‘‘इंडियन हॉकी संघाचे पुरुष आणि महिला दोन्हीही आगामी कॉमनवेल्थ खेळांमध्ये खेळणार नाहीत. कारण खेळ होत असलेल्या ब्रिटन येथे कोरोनासंबधी नियम अधिक कठोर केले आहे. लसीचे दोन्ही डोस झालेल्या भारतीयांनाही 10 दिवसांच्या विलगीकरणात रहावे लागणार आहे. त्यामुळे इंग्लंडच्या या भेदभावपूर्ण नियमांमुळे भारताने हा निर्णय घेतला आहे.’’ दरम्यान भारतीय पुरुष हॉकी संघ 2018 च्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्य पदकाच्या सामन्यादरम्यान इंग्लंडकडून 1-2 ने पराभूत झाला होता. तर महिला संघाला 0-6 ने मोठा पराभव झेलावा लागला होता. त्यानंतर यंदा मात्र कॉमनवेल्थमध्ये भारत आणि इंग्लंड हा सामना पाहता येणार नाही.
हे ही वाचा
PKL 8: कबड्डी, कबड्डी, कबड्डी! प्रो लीग कबड्डीच्या तारखा जाहीर, ‘या’ दिवशी होणार स्पर्धेला सुरुवात
T20 World Cup 2021 च्या सामन्यांना प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत मोठा निर्णय, ICC ने दिली माहिती
IPL 2021: दिल्लीचा चेन्नईवर रोमहर्षक विजय, गुणतालिकेतही मिळवलं अव्वल स्थान
(Indian hockey teams have officially pulled out of birmingham commonwealth games 2022)