Tokyo Paralympics: भाविना पटेलची ऐतिहासिक कामगिरी, टेबल टेनिसच्या सेमीफायनलमध्ये एन्ट्री, भारताचं पदक पक्क
टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये भारताची टेबल टेनिसपटू भाविना पटेलने ऐतिहासिक कामगिरी करत सेमीफायनलमध्ये धडक घेतली आहे. सुरुवातीचा एक सामना पराभूत झाल्यानंतर भाविनाने सलग तीन सामने जिंकले आहेत.
Tokyo Paralympics 2020: टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) अप्रतिम कामगिरी केल्यानंतर आता टोक्यो पॅरालिम्पिकमध्येही (Tokyo Paralympics-2020) भारताचे पॅरा एथलिट्स आपला झेंडा फडकावत आहेत. टेबल टेनिसपटू भाविना पटेलने (Bhavina Patel) सलग तीन सामने जिंकत सेमी फायनलमध्ये जागा मिळवली आहे. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे. सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवल्यामुळे तिने भारतासाठी किमान कांस्य पदक पक्के केले आहे. त्यामुळे भारताचं पॅरालिम्पिकमधील पदकाचं खातं उघडलं गेलं आहे.
India’s first ? is assured at #Paralympics!
Bhavina Patel becomes the first Indian Paralympian to assure the country of a medal at Tokyo 2020 #Paralympics as she reached the semi-finals of table tennis class 4 event today.
#Praise4Para #Cheer4India https://t.co/HWoVeneTD7
— ALL INDIA RADIO आकाशवाणी (@AkashvaniAIR) August 27, 2021
भाविनाने जगातील नंबर दोनची खेळाडू असणाऱ्या सर्बियाच्या बोरिस्लावा पेरि (Borislava Perić) हीला 3-0 ने मात देत सामना जिंकला. आता भाविना अंतिम 4 मध्ये पोहोचली असून पदकापासून केवळ एक पाऊल दूर आहे. तिने हा सामना 11-5, 11-6 आणि 11-7 अशा सरळ तीन सेट्समध्ये जिंकत आपल्या नावे केला.
Bhavina In Semifinal!!@BhavinaPatel6 wins her Class 4 Quarterfinal match 3-0 (11-5, 11-6, 11-7) against #SRB Borislava Rankovic Peric to advance to the Semifinal
Brilliant performance by Bhavina!
Let’s cheer loudly for her with #Cheer4India #Praise4Para pic.twitter.com/67MOGM7XdA
— SAI Media (@Media_SAI) August 27, 2021
भाविना पटेलने रचला इतिहास
भारताच्या भाविना पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक्सच्या टेबल टेनिस स्पर्धेत इतिहास रचला आहे. या खेळात सेमीफायनलपर्यंत पोहोचणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. याआधी भाविनाने आज सकाळीच राउंड ऑफ 16 च्या सामन्यात ब्राझीलच्या ओलिविएराला मात देत विजय मिळवला होता. भाविनाने तिसऱ्या सेटमध्ये हा सामना जिंकला. सामन्यात भाविनाने पहिला सेट 12-10 ने, दूसरा सेट 13-11 ने आणि तिसरा सेट 11-6 च्या फरकाने जिंकत सामना आपल्या नावे केला होता. त्यानंतर आता उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तिने सर्बियाच्या बोरिस्लावाला 3-0 ने मात सेमीफायनल गाठली आहे. भाविनाच्या या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
इतर बातम्या
Tokyo Paralympics: भारताने उघडलं विजयाचं खातं, टेबल-टेनिसपटू भाविना पटेल दुसऱ्या सामन्यात विजयी
(Indias table tennis player bhavina patel won match and reached in Semi finals of tokyo paralympics)