EURO 2020 स्पर्धेची दिमाखात सांगता, ‘या’ खेळाडूला मिळाला गोल्डन बूट
अत्यंत चुरशीच्या झालेल्या युरो चषकाच्या अंतिम सामन्यात इटलीने इंग्लंडवर विजय मिळवला. पण स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दिला जाणारा गोल्डन बूट हा इंग्लंड किंवा इटली नाही तर वेगळ्याच संघातील खेळाडूला मिळाला.
लंडन : संपूर्ण फुटबॉल जगताचे लक्ष लागून युरो चषकाचा (Euro Cup 2020) अंतिम सामना लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर इटली आणि इंग्लंड (Italy vs England) यांच्यात पार पडला. चुरशीच्या सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीने 3-2 ने विजय मिळवत सामना आपल्या नावे केला आणि युरो चषकावर नाव कोरले. सामन्यानंतर यंदाच्या स्पर्धेतील पुरस्कारांचे वाटप करण्यात आले यावेळी विजयी ट्रॉफी इटलीला दिल्यानंतर द्वितीय विजेता म्हणून इंग्लंडला पुरस्कृत करण्यात आले. पण अनेकांचे लक्ष लागून राहिलेला गोल्डन बुट हा पोर्तुगाल संघाचा कर्णधार ख्रिस्तीयानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo Wins Golden Boot) याला देण्यात आला. स्पर्धेत तब्बल 5 गोल करणाऱ्या रोनाल्डोचा संघ जरी बाद फेरीच्या सामन्यात बाहेर गेला असला तरी त्याने केलेल्या उत्कृष्ठ खेळामुळे त्याला पुरस्कृत करण्यात आले. (Italy deafeated England and Won Euro Cup 2020 but Golden boot Award Won By portugals Cristiano Ronaldo)
? 5 goals in 4 games…
?? Portugal forward Cristiano Ronaldo = EURO 2020 Alipay Top Scorer ?#EUROTopScorer | @Alipay pic.twitter.com/OU9rLeSbjI
— UEFA EURO 2020 (@EURO2020) July 11, 2021
अत्यंत उत्कंठावर्धक झालेल्या युरो चषक स्पर्धेत (Euro Cup 2020) सर्वच सामने अटीतटीचे झाले. अनेक आश्चर्यचकित करणारे निर्णयही समोर आले आणि अखेर इटलीने इंग्लंडला नमवत स्पर्धेची सांगता केली. यानंतर सर्व संघ आणि खेळाडूंना बक्षिस वाटप करण्यात आले. यावेळी युरोपचे चॅम्पियन ठरलेल्या इटली संघाला तब्बल 10 मिलियन युरोस (भारतीय रुपयांनुसार सुमारे 88 कोटीं) देण्यात आले. तर रनरअप इंग्लंड संघाला 7 मिलियन यूरोस (भारतीय रुपयांनुसार सुमारे 62 कोटी) बक्षिस म्हणून देण्यात आले.
चेक रिपब्लिकच्या पॅट्रिक शीकला सिल्वर बुट
रोनाल्डोला गोल्डन बुट देण्यात आला. तर सिल्वर बुट हा चेक रिपब्लिकच्या पॅट्रिक शीक याला देण्यात आला. त्यानेही संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम प्रदर्शन केले. त्याने मैदानाच्या मध्यातून दागलेला एक गोल स्पर्धेतील अविस्मरणीय गोल ठरला. यासह ब्रॉन्ज बूट फ्रान्सच्या करीम बेंजिमा याला देण्यात आला.
लियोनार्डो ठरला स्टार ऑफ द मॅच
सामन्यात एका गोलने पिछाडीवर असणाऱ्या इटलीला गोल करत बरोबरीत आणणाऱ्या लियोनार्डो बोनुची याला स्टार ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. तर प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा गोल्डन बॉल तब्बल 9 अप्रतिम गोल अडवणाऱ्या इटलीच्या गोलकिपर जियानलुइजी डोनारमा याला देण्यात आला. तसेच स्पेनचा युवा खेळाडू पेड्री याला यंग प्लेयर ऑफ द टूर्नामेंटने नावाजले गेले.
? Great distribution throughout ? Strong defensive display at 34 ⚽️ Scored the all-important equaliser
?? Italy hero Leonardo Bonucci = Star of the Match! ?
? Did you predict that?@Heineken | #EUROSOTM | #EURO2020 pic.twitter.com/zNdJbntUiE
— UEFA EURO 2020 (@EURO2020) July 11, 2021
हे ही वाचा :
EURO 2020 : इंग्लंडची कडवी झुंज अपयशी, युरो चषक इटलीच्या नावे!
(Italy deafeated England and Won Euro Cup 2020 but Golden boot Award Won By portugals Cristiano Ronaldo)