VIDEO: मूर्ती लहान पण किर्ती महान, केवाय वेंकटेश यांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रपती उतरले मंचावरुन खाली
यंदाच्या वर्षीचे पद्मश्री पुरस्कार नुकतेच जाहीर करुन नवी दिल्ली येथे त्याचे वाटप करण्यात आले. यंदा केंद्र सरकारने 7 खेळाडूंना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने यंदाच्या वर्षीच्या पद्मश्री पुरस्कारांना मंगळवारी बहाल केलं. यावेळी त्यांनी 7 खेळाडूंना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी पॅरा एथलिट केवाय वेंकटेश (KY Venkatesh) यांचाही पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला. वेंकटेश हे पॅरा एथलिट असून त्यांची उंची अत्यंत कमी आहे. त्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना (Ramnath Kovind) पोडियमवर उभं राहून त्यांचा सन्मान करणं शक्य नव्हतं. अशावेळी राष्ट्रपतींनी मंचावरून खाली उतरून वेंकटेश यांना पद्मश्री बहाल केला. ही सर्व कृती पाहून सर्वांनाच आनंद झाला अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
पॅराएथलिट केवा वेंकटेश यांची या अॅकॉन्ड्रोप्लासिया या आजारमुळे 4 फूट 2 इंचांहून उंची वाढलीच नाही. पण अशा परिस्थितीवर मात करत त्यांनी खेळ खेळणं सोडलं नाही. अखेर त्यांनी पॅरालिम्पिक्समध्ये भारताचं नेतृत्त्व केलं. त्यांनी अनेक पदकं भारतासाठी जिंकली आहेत. अखेर त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांचा यंदा पद्मश्रीने सन्मान करण्यात आला. तर त्यांचा सन्मानाचा व्हिडीओ सर्वक्ष व्हायरल होत असून भाजपाचे नेते विनोद तावडे यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे.
Be yourself, the world will adjust!! pic.twitter.com/dPlLPZsFfY
— Vinod Tawde (@TawdeVinod) November 10, 2021
कोण आहेत केवाय वेंकटेश?
44 वर्षीय केवाय व्यंकटेश हे मूळचे कर्नाटकातील बंगळुरू येथील आहेत. लहानपणी आजारामुळे उंची न वाढू शकलेल्या वेंकटेश यांनी अथक परिश्रमांनी पॅरालिम्पिक्समध्ये 1994 साली भारताचं पहिल्यांदा प्रतिनिधित्व केले. 2009 मध्ये पाचव्या पॅरालिम्पिक स्पर्धेत त्यांनी भारताचे नेतृत्व केले. त्या वर्षी देशाने 17 पदके जिंकली. केवाय व्यंकटेशने 2005 मध्ये चौथ्या वर्ल्ड ड्वार्फ गेम्समध्ये सहा पदके जिंकून ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नाव देखील नोंदवलं होतं. सध्या ते कर्नाटक पॅरा-बॅडमिंटन संघटनेचे सचिव म्हणून काम करतात.
इतर बातम्या
टीम इंडियात उभी फूट, विराट कोहली लवकरच संन्यास घेणार; दिग्गज पाकिस्तानी खेळाडूचं भाकित
(KY Venkatesh honored by Padmashree President Step down from Podium for him)