VIDEO : हॅट्रिक गोल केल्यानंतर लिओनल मेस्सी भावूक, मैदानातच अश्रू अनावर
कोपा अमेरिका ही मानाची स्पर्धा अर्जेंटीनाच्या संघाने ब्राझीलला 1-0 ने नमवत जिंकली. संघाचा कर्णघार मेस्सीसाठी सहा एक अत्यंत मोठा आणि मानाचा विजय होता.
मुंबई: जगातील अव्वल दर्जाच्या फुटबॉल पटूंमधील एक असणाऱ्या लिओनल मेस्सीने (Lionel Messi) फुटबॉल जगतातील एक मानाची स्पर्धा असणाऱ्या कोपा अमेरिका चषकाचा अंतिम सामना (Copa America 2021 Final) काही दिवसांपूर्वीच ब्राझीलला नमवत जिंकला. जागतिक फुटबॉलमध्ये अनेक रेकॉर्ड तोडणाऱ्या मेस्सीला देशासाठी मात्र मोठ्या स्पर्धेतील ट्रॉफी आतापर्यंत मिळवून देता आली नव्हती. अखेर त्याने कोपा अमेरिका स्पर्धा जिंकत त्याच आणि देशवासियांच स्वप्न पूर्ण केलं. पण ही स्पर्धा ब्राझीलमध्ये असल्याने त्याला आतापर्यंत देशवासियांसोबत आनंद साजरा करता आला नव्हता.
अखेर गुरुवारी वर्ल्ड कप क्वालीफाईंगच्या सामन्यात बोलिविया संघावर 3-0 अर्जेंटीनाने विजय मिळवल्यानंतर मेस्सीने त्याच्या देशवासियांसोबत आनंद साजरा केला. यावेळी मेस्सीला मैदानावर अश्रू अनावर झाले होते. त्याला त्याचे संघातील खेळाडू सतत सांभाळत होते. पण इतक्या मोठ्या क्षणी मेस्सीला अश्रू रोखण कठीण जात होतं. त्याच्यासाठी हा एक मोठा विजय होता.
Lionel Messi finally got to celebrate the Copa America victory with the Argentinian people, and it all got a bit too much ?? pic.twitter.com/cP7nZFOc0X
— Mirror Football (@MirrorFootball) September 10, 2021
मेस्सीने तोडलं पेलेंचं रेकॉर्ड
मेस्सीने बोलविया संघाविरुद्ध हॅट्रीक करत तीन गोल नोंदवले. यासोबतच त्याने ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचा 50 वर्षांपूर्वीचा रेकॉर्डही तोडला. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा दक्षिण अमेरिकेतील खेळाडू म्हणून आता मेस्सीचं नाव झालं आहे. मेस्सीने आंतरराष्ट्रीय दर्जावर 79 गोल केले आहेत. ज्यासाठी त्याने 153 सामने खेळले. तर पेले यांनी 92 सामन्यात 77 गोल केले होते. तर जागतिक फुटबॉलचा विचार करता पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने 180 सामन्यात सर्वाधिक 111 गोल केले आहेत.
हे ही वाचा :
Copa America Final Winner : विजयानंतर अर्जेंटीना संघाचा जल्लोष, मेस्सीला अश्रू अनावर, पाहा फोटो
(Lionel messi finally Celebrated copa america victory with argentinian people got emotional on ground)