Lionel messi barcelona : 17 वर्षांचा प्रवास संपला, लिओनल मेस्सीचा बार्सिलोना संघाला रामराम!
जागतिक फुटबॉलमधील एक मोठं नाव असणाऱ्या लिओनल मेस्सीने बार्सिलोना क्लबला अलविदा करण्याचा निर्णय़ घेतला आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या या चर्चेची संघाने स्वत: ट्विट करत पुष्टी केली आहे.
मुंबई : तब्बल 17 वर्ष, 778 सामने, 672 गोल्स आणि 35 चषक मिळवून दिल्या नंतर लिओनल मेस्सी आणि बार्सिलोना हे सुरेख समीकरण अखेर संपुष्टात आलं आहे. अवघ्या 13 वर्षांचा असताना बार्सिलोना संघाकडून खेळू लागलेल्या लिओनल मेस्सीने (Lionel Messi) अखेर स्पॅनिश क्लब बार्सिलोना (barcelona) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच बार्सिलोना क्लबने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन याबाबतची माहिती दिली. (Lionel Messi will leave FC Barcelona News Confirmed by Club)
बार्सिलोना क्लबने त्यांच्या अधिकृत ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, ‘मेस्सीचे क्लबसोबतचा करार संपला असून आता नवीन करार तयार करण्यात येत होता. पण क्लब आणि खेळाडू यांच्यात नवीन करारातील आर्थिक आणि संरचनात्मक अडथळ्यांमुळे हा करार होऊ शकला नाही. ज्यामुळे मेस्सी यापुढे संघाकडून खेळणार नाही.’ या सोबतच संघाने मेस्सीला त्याच्या पुढील वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनासाठीही शुभेच्छा दिल्या आहेत.
LATEST NEWS | Leo #Messi will not continue with FC Barcelona
— FC Barcelona (@FCBarcelona) August 5, 2021
बार्सिलोना संघाची मेस्सीच्या उपचारासाठी मदत
लिओनल मेस्सी अवघ्या 6 वर्षांचा असताना अर्जेंटिनाच्या रोजारियो येथील ‘न्यूएल्स ओल्ड बॉयज क्लब’ सोबत जोडला गेला. वडिलांनी फुटबॉल खेळण्यासाठी प्रेरणा दिलेल्या मेस्सीसोबत दररोज सरावासाठी त्याची आज्जी सोबत असायची. बालपणीपासूनच अथक मेहनत करणाऱ्या मेस्सीला अवघ्या 10 वर्षांचा असताना ‘ग्रोथ हार्मोन डिफिशिएन्सी’ या गंभीर आजाराने ग्रासलं. या आजारात व्यक्तीची शाररिक वाढ खुंटते. त्यामुळे हा आजार मेस्सीवर पूर्णपणे हावी झाला असता तर मेस्सी कधीच फुटबॉल खेळू शकला नसता. आजाराचा खर्चही खूप असल्याने मेस्सीची फॅमिली चिंतेत होती.
त्यावेळी मेस्सीचा अप्रतिम खेळ पाहून बार्सिलोना संघाने त्याला खेळण्याची ऑफर दिली आणि उपचाराचा खर्च उचलणार असल्याचेही कबूल केले. त्यानंतर मेस्सी बार्सिलोनासोबत जोडला गेला साध्या टिशू पेपरवर मेस्सीला पहिलं कॉन्ट्रेक्ट लिहून दिलं आणि 14 वर्षांचा मेस्सी बार्सिलोनामध्ये सामिल झाला. त्यानंतर मेस्सीने कधीच मागे वळून पाहिलं नाही आणि बघता बघता यशाची एक एक शिखरं सर केली आणि संघासह स्वत:ला सर्वोच्च स्थानी पोहोचवलं. आज हा महान प्रवास संपला असून मेस्सी यापुढे बार्सिलोनाच्या जर्सीत कधीच खेळताना दिसणार नाही.
हे ही वाचा
दहाव्या वर्षी उपचारासाठी मदत, 20 वर्षांपासून तोच संघ, कोट्यवधींच्या ऑफर्स धुडकावल्या
(Lionel Messi will leave FC Barcelona News Confirmed by Club)