Khel Ratna Award: नीरज चोप्रासह 11 खेळाडूंची खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस, क्रिकेटपटू मिथाली राजसह फुटबॉलपटू सुनील छेत्रीचाही समावेश
देशातील खेळाडूंसाठी सर्वात मानाचा पुरस्कार असणाऱ्या खेलरत्न पुरस्कारासाठी नीरज चोप्रासह 11 खेळाडूंची शिफारस करण्यात आली आहे. तर 35 खेळाडूंची अर्जून पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
नवी दिल्ली: देशातील खेळाडूंसाठी सर्वात मानाचा पुरस्कार असणाऱ्या खेलरत्न पुरस्कारासाठी (Khel Ratna Award) शिफारस करण्यात आलेल्या खेळाडूंची नावं समोर आली आहेत. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समितीने (The national sports awards committee) ही माहिती दिली आहे. या माहितीनुसार शिफारस करण्यात आलेल्यांमध्ये ऑलिम्पिकमधील पदकविजेत्यांसह भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिथाली राज, फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री अशा एकूण 11 खेळाडूंची नावं आहेत. तर अर्जून पुरस्कारासाठीही 35 खेळाडूंची शिफारस कऱण्यात आली आहे.
खेलरत्न पुरस्काराला काही दिवसांपूर्वीच राजीव गांधीचं नाव हटवून माजी दिग्गज हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचं नाव देण्यात आलं होतं. त्यानंतरचा हा पहिलाच पुरस्कार वितरण सोहळा आहे. यावेळी खेलरत्नसाठी सुवर्णपदक विजेच्या नीरज चोप्रासह, पैलवान रवी दहिया, हॉकी संघाचा गोलकिपर पीआर श्रीदेश, बॉक्सर लवलिना सह क्रिकेटर मिथाली राज आणि फुटबॉलर सुनील छेत्री अशा काही दिग्गजांची नावं सूचवण्यात आली आहेत. काही पॅराअॅथलिट्सचीही नाव या यादीत आहेत.
ऑलिम्पिकसह पॅरालिम्पिकमधील खेळाडूंचा जलवा
मागील वर्षी या मानाच्या पुरस्काराने 5 खेळाडूंना सन्मानित करण्यात आलं होतं. यंदा मात्र टोक्यो ऑलिम्पिक आणि टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळे सुवर्णपदक विजेत्या नीरजसह ऑलिम्पिकधील 4 पदकविजेते आणि टोक्यो पॅरालिम्पिकमधील 5 खेळाडूंना सन्मानित करण्यात येणार आहे. तर क्रिकेटपटू मिथाली आणि फुटबॉलपटू सुनीलसह 35 अन्य खेळाडूंचं नाव अर्जून पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलं आहे.
खेलरत्नसाठी शिफारस करण्यात आलेले खेळाडू
- नीरज चोप्रा (भालाफेक)
- रवी दहिया (कुस्ती)
- पीआर श्रीजेश (हॉकी)
- लवलिना बोरगोहेन (बॉक्सिंग)
- सुनील छेत्री (फुटबॉल)
- मिथाली राज (क्रिकेट)
- प्रमोद भगत (बॅडमिंटन)
- सुमित अंतील (भालाफेक)
- अवनी लेखरा (शूटींग)
- कृष्णा नागर (बॅडमिंटन)
- एम नरवान (शूटींग)
देशातील सर्वात मानाचा पुरस्कार
प्रत्येक खेळाडचं स्वप्न असतं की त्याला खेलरत्न हा महान पुरस्कार मिळावा. देशातील खेळाडूंसाठी सर्वात मानाचा असणारा हा पुरस्कार 1992 पासून राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार या नावाने दिला जात होता. जो यंदा दिग्गज माजी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या नावाने देण्यास सुरुवात झाली आहे. या पुरस्कारात 25 लाख रुपये रोख रक्कम दिली जाते. दरम्यान या पुरस्काराचा सर्वात पहिला मानकरी हा बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद हा आहे.
हे ही वाचा
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेपूर्वीच मुंबई संघावर संकट, संघातील 4 खेळाडू कोरोनाबाधित
T20 World Cup: महत्त्वाच्या सामन्याआधी आफ्रिकेच्या डिकॉकची सामन्यातून माघार, कारण ऐकून थक्क व्हाल!
(Neeraj chopra with 11otherd recommended for Khel Ratna award and 35 others named for Arjuna Award in marathi)