Khel Ratna Award: शिखर धवनसह 35 खेळाडूंना अर्जून पुरस्कार, संपूर्ण हॉकी संघाचा समावेश

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रासह 11 खेळाडूंची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. तर क्रिकेटपटू शिखर धवन आणि हॉकी संघासह एकूण 35 खेळाडूंची अर्जून पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

Khel Ratna Award: शिखर धवनसह 35 खेळाडूंना अर्जून पुरस्कार, संपूर्ण हॉकी संघाचा समावेश
पुरुष हॉकी संघ आणि शिखर धवन
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 8:46 PM

नवी दिल्ली: भारत सरकारच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समितीने (The national sports awards committee) देशातील खेळाडूंसाठी सर्वात मानाचा पुरस्कार असणाऱ्या खेलरत्न पुरस्कारासासह (Khel Ratna Award) अर्जून पुरस्कारासाठीच्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. खेलरत्नसाठी ऑलिम्पिकमधील पदकविजेत्यांसह भारतीय महिला क्रिकेटर मिथाली राज, फुटबॉलर सुनील छेत्री यांच नाव आहे. तर अर्जून पुरस्कारासाठी क्रिकेटर शिखर धवनसह हॉकी संघासह 35 खेळाडूंची शिफारस कऱण्यात आली आहे.

खेलरत्नसाठी शिफारस केलेल्या खेळाडूंमध्ये नीरजसह ऑलिम्पिकधील 4 पदकविजेते आणि टोक्यो पॅरालिम्पिकमधील 5 खेळाडू आहेत. तर अर्जून पुरस्कारामध्ये शिखर धवनसह संपूर्ण हॉकी संघ आणि पॅराएथलिट्सचाही समावेश आहे. यामध्ये सुहास एलवाई (Suhas LY), भाविना पटेल (Bhavina Patel) अशी नाव सामिल आहेत. तर भारतीय पुरुष हॉकी संघाने यंदा कांस्य पदक जिंकल्यामुळे संपूर्ण संघाला अर्जून पुरस्कार देण्यात येणार आहे. तर गोलकिपर पीआर श्रीजेशला दीड दशकापासून हॉकी संघात असल्याने खेलरत्न देण्यात येणार आहे.

अर्जून पुरस्कार विजेता पुरुष हॉकी संघ

सुरेंद्र कुमार, हरमणप्रीत सिंग, रुपींदर पाल सिंग,अमित रोहिदास, बींरेद्र लाक्रा, हार्दीक सिंग, विवेक सागर प्रसाद, निलंकाता शर्मा, सुमीत, शमशेर सिंग, दिलप्रीत सिंग, गुरजंत सिंग, ललीत कुमार उपाध्याय आणि मंदीप सिंग

खेलरत्नसाठी शिफारस करण्यात आलेले खेळाडू

  • नीरज चोप्रा (भालाफेक)
  • रवी दहिया (कुस्ती)
  • पीआर श्रीजेश (हॉकी)
  • लवलिना बोरगोहेन (बॉक्सिंग)
  • सुनील छेत्री (फुटबॉल)
  • मिथाली राज (क्रिकेट)
  • प्रमोद भगत (बॅडमिंटन)
  • सुमित अंतील (भालाफेक)
  • अवनी लेखरा (शूटींग)
  • कृष्णा नागर (बॅडमिंटन)
  • एम नरवाल (शूटींग)

देशातील सर्वात मानाचा पुरस्कार

प्रत्येक खेळाडचं स्वप्न असतं की त्याला खेलरत्न हा महान पुरस्कार मिळावा. देशातील खेळाडूंसाठी सर्वात मानाचा असणारा हा पुरस्कार 1992 पासून राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार या नावाने दिला जात होता. जो यंदा दिग्गज माजी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या नावाने देण्यास सुरुवात झाली आहे. या पुरस्कारात 25 लाख रुपये रोख रक्कम दिली जाते. दरम्यान या पुरस्काराचा सर्वात पहिला मानकरी हा बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद हा आहे.

हे ही वाचा

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेपूर्वीच मुंबई संघावर संकट, संघातील 4 खेळाडू कोरोनाबाधित

T20 Ranking: पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाचा विराटला रँकिगमध्येही फटका, पाकिस्तानच्या रिजवानने टाकलं मागे

T20 World Cup: महत्त्वाच्या सामन्याआधी आफ्रिकेच्या डिकॉकची सामन्यातून माघार, कारण ऐकून थक्क व्हाल!

(Neeraj chopra with 11others recommended for Khel Ratna award and Shikhar dhawan and 35 others named for Arjuna Award in marathi)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.