SPORTS: राष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत औरंगाबादच्या निकेतला सुवर्णपदक, स्विमिंग-सायकलिंग-रनिंग तिन्ही फेऱ्यांत अव्वल

औरंगाबाद: रविवारी चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत (National Triathlon competition ) औरंगाबादचा पहिला दिव्यांग आयर्नमॅन निकेत दलाल (Niket dalal) चँपियन ठरला. दिव्यांगासाठी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले. त्याने स्प्रिंटच्या तिन्ही इव्हेंटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करताना चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. अंध निकेतने आपल्या गटातील 18 स्पर्धकांमधून अव्वल स्थान गाठले. स्विमिंगमध्ये […]

SPORTS: राष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत औरंगाबादच्या निकेतला सुवर्णपदक, स्विमिंग-सायकलिंग-रनिंग तिन्ही फेऱ्यांत अव्वल
राष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत औरंगाबादचा निकेत दलाल याला सुवर्ण पदक.
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 6:47 PM

औरंगाबाद: रविवारी चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत (National Triathlon competition ) औरंगाबादचा पहिला दिव्यांग आयर्नमॅन निकेत दलाल (Niket dalal) चँपियन ठरला. दिव्यांगासाठी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले. त्याने स्प्रिंटच्या तिन्ही इव्हेंटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करताना चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. अंध निकेतने आपल्या गटातील 18 स्पर्धकांमधून अव्वल स्थान गाठले.

स्विमिंगमध्ये 9 मिनिटात 250 मीटरचे अंतर गाठले

चेन्नई येथे, भारतीय ट्रायथलॉन महासंघांच्यावतीने या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत औरंगाबादचा दिव्यांग आयर्नमॅन निकेत दलालने सहभाग घेतला. त्याने सुपर स्प्रिंटच्या तिन्ही इव्हेंटमध्ये लक्षवेधी कामगिरी केली. त्याने स्वींमिंगमध्ये 9 मिनिटांत निश्चित 250 मीटरचे अंतर गाठून अव्वल स्थानी धडक मारली. ओपन वॉटरमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर त्याने सायकलिंग करताना ७ किलोमीटरचे अंतर 14 मिनिट 16 सेकंदांत पूर्ण केले. त्यापाठोपाठ रनिंगचे 1.3 किमीचे अंतर 7 मिनिटे 55 सेकंदांत गाठले. प्रत्येक फेरीत अव्वल क्रमांक पटकावत औरंगाबादच्या खेळाडूने सुवर्णपदक प्राप्त केले.

तीन फेऱ्यांत मारली बाजी

निकेत दलालने सुपर स्प्रिंट इव्हेंट मध्ये 250 मीटर स्विमिंग (ओपन वॉटर) – 9 मिनिट सायकलिंग (7 किलोमीटर , दोन लॅप) – 14 मिनिटे 16 सेंकद रनिंग (1.3 किलो मीटर)-7 मिनिटे 55 सेकंदात पार केले. इतर स्पर्धकांच्या तुलनेत तो सर्व फेऱ्यांमध्ये अव्वल राहिला.

आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवणार!

निकेत दलालने या स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. नियोजनबद्ध सराव केला. याच मेहनतीतून त्याला सोनेरी यशाचा पल्ला गाठता आला. आगामी काळातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्याला आपला ठसा उमटवण्याची मोठी संधी आहे. प्रचंड क्षमता आणि इच्छाशक्तीच्या बळावर त्याने या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली, अशी प्रतिक्रिया निकेतचे प्रशिक्षक अभय देशमुख यांनी दिली.

‘खेलो इंडिया’साठी योगासन स्पर्धेकरिता व्हिडिओ पाठवण्याचे आवाहन

खेलो इंडिया निवड प्रक्रीयेसाठी योगासन स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्यातून जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील संघाची निवड केली जाणार आहे. मुला-मुलींच्या स्वतंत्र तीन वयोगटात होणार्‍या या स्पर्धेतून प्रत्येक गटातील चौदा खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय पातळीवरील संघात निवड केली जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीने होणार्‍या या स्पर्धेत सहभागी होणार्‍या खेळाडूंकडून योगासनांच्या विविध पाच स्पर्धा प्रकारांचे व्हिडिओ मागविण्यात आले आहेत. या स्पर्धेत सहभागी होवू इच्छिणार्‍या योगासन खेळाडूंनी आपल्या जिल्ह्यातील स्पर्धा समन्वयकांशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे सचिव डॉ.संजय मालपाणी यांनी केले आहे.

इतर बातम्या- 

डोक्यावर कॅप, अंगात कुर्ता, पायात स्पोर्ट्स शूज, प्रत्येक मैदान घडवण्यात त्यांचा हात, कोण होते मराठवाड्याचे ग्राउंडमॅन?

National Sports day: औरंगाबादच्या मातीतला क्रिकेटर अमेरिकन संघात, सुशांतच्या क्रिकेट भरारीची खास कहाणी 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.