Padma Award 2022 : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राला पद्म श्री, तर देवेंद्र झाझरीयाला पद्म भूषण पुरस्कार जाहीर

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची (Padma Awards) घोषणा करण्यात आली आहे. एकूण सहा क्रीडापटूंना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.

Padma Award 2022 : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राला पद्म श्री, तर  देवेंद्र झाझरीयाला पद्म भूषण पुरस्कार जाहीर
यंदाच्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने समस्त भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. भालाफेकीमध्ये नीरजने थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली. अॅथलेटीक्सच्या प्रकारात भारताला मिळालेले ऑलिम्पिकमधील हे पहिले पदक आहे.
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 9:43 PM

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची (Padma Awards) घोषणा करण्यात आली आहे. एकूण सहा क्रीडापटूंना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रालाही (Neeraj Chopra) पद्म श्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेतील देवेंद्र झाझरीयाला (Devendra Jhajharia) पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील हा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.

भारतीय महिला हॉकी संघातील स्टार खेळाडू वंदना कटारिया, टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेतील अवनी लेखारा, सुमीत अंतिल, आणि प्रमोद भगत यांना पद्म श्री पुरस्कार जाहीर झाला आहे. भारताच्या फुटबॉल संघाचे माजी कर्णधार ब्रम्हानंद यांना सुद्धा पद्म श्री पुरस्कार जाहीर झाला आहे. 67 वर्षाच्या ब्रम्हानंद यांनी गोलकिपर म्हणून 1983 ते 1986 दरम्यान भारतीय फुटबॉल संघाचे नेतृत्व केले होते. यंदाच्यावर्षी राष्ट्रपतींनी 128 पद्म पुरस्कारांना मंजुरी दिली.

चौघांना पद्म विभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 107 पद्म श्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार मिळवणाऱ्यांमध्ये 34 महिला आहेत. नीरज चोप्रा, अवनी लेकहारा, सुमीत अंतिल आणि प्रमोद भगत यांना 2021 मध्य खेल रत्न पुरस्कार प्राप्त झाला होता. अथलॅटिक्समध्ये भालापेकीच्या प्रकारात नीरज चोप्राने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. हरयाणाच्या नीरजने 87.58 मीटर अंतरापर्यंत भालाफेक करुन भारताच्या खात्यात सुवर्णपदक जमा केले.

पद्म पुरस्कार विजेत्या क्रिडापटुंची यादी

देवेंद्र झाझरीया – पॅरालिम्पिक – पद्म भूषण

सुमीत अंतिल – पद्म श्री

प्रमोद भगत – पद्म श्री

नीरज चोप्रा – भालाफेक – पद्म श्री

वंदना कटारिया – हॉकी – पद्म श्री

अवनी लेखहारा – पद्म श्री

ब्रम्हानंद – फुटबॉल – पद्म श्री

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.