PKL8 : टेबल टॉपर Dabang Delhi ला Gujarat Giants ची जोरदार टक्कर, सामना बरोबरीत
प्रो-कबड्डी लीगमध्ये रविवारी दिवसातील पहिलाच सामना अटीटतीचा झाला. पहिल्या सामन्यात दबंग दिल्ली आणि गुजरात जायंट हे दोन संघ भिडले. उभय सघांमधील हा रोमहर्षक सामना बरोबरीत संपला.
बंगळुरु : प्रो-कबड्डी लीगमध्ये रविवारी दिवसातील पहिलाच सामना अटीटतीचा झाला. पहिल्या सामन्यात दबंग दिल्ली आणि गुजरात जायंट हे दोन संघ भिडले. उभय सघांमधील हा रोमहर्षक सामना बरोबरीत संपला, दबंग दिल्ली आणि गुजरात जायंट्समधील हा सामना 24-24 असा बरोबरीत सुटला. (PKL8 : Dabang Delhi vs Gujarat Giants match tie, Naveen Kumar impresses with his performance)
दिल्लीकडून या सामन्यात नवीन कुमारने सर्वाधिक 11 पॉईंट्स मिळवले. त्याने 8 रेड पॉईंट्स आणि 3 बोनस पॉईंट्सची कमाई केली. तर विजय मलिकने 5 पॉईंट्स (4 रेड, 1 बोनस) मिळवत त्याला चांगली साथ दिली. संदीप नरवालने 2 टॅकल पॉईंट्स मिळवले. अजय ठाकूर आणि क्रिशनने प्रत्येकी 1-1 टॅकल पॉईंट मिळवला.
दुसऱ्या बाजूला गुजरात जायंट्सकडून राकेश नरवालने 9 पॉईंट्स मिळवले. त्यात 7 रेड पॉईँट्स आणि 2 बोनस पॉईंट्सचा समावेश होता. राकेश सुंग्रोयाने 5 गुण (4 रेड, 1 बोनस) मिळवले. महेंद्र गणेश राजपुतने 2 रेड पॉईंट्सची कमाई केली. तर सुनील कुमारने या सामन्यात 4 टॅकल पॉईंट्स मिळवले. रवींद्र पहलने 1 टॅकल पॉईंट मिळवला.
Point-point pe likha tha lene waale ka naam ?
What a game we’ve had! #GGvDEL ends in a thrilling tie.#SuperhitPanga #vivoProKabaddi pic.twitter.com/XrdWt6LZlB
— ProKabaddi (@ProKabaddi) December 26, 2021
दिल्ली पहिल्या स्थानी कायम
गुजरातला त्यांच्या शेवटच्या सामन्यात बंगाल वॉरियर्सकडून 31-28 असा पराभव स्वीकारावा लागला होता. अशा परिस्थितीत गुजरातचा संघ आज पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होता. दुसरीकडे, दबंग दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर यू मुंबाला हरवून हा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला होता. आजचा सामना बरोबरीत सुटल्याने दिल्लीला फटका बसला आहे, मात्र हा संघ अद्याप गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.
इतर बातम्या
Pro Kabaddi League PKL 2021-22: कोल्हापूरच्या सिद्धार्थची अपयशी झुंज, पुण्याचा पहिला विजय
Pro Kabaddi League PKL 2021-22: फक्त एका पॉईंटने प्रदीप नरवालच्या यूपी योद्धाची पटनावर मात
(PKL8 : Dabang Delhi vs Gujarat Giants match tie, Naveen Kumar impresses with his performance)