PKL 2021-22: Dabang delhi vs Bengal warriors: सुपरफास्ट नवीन एक्स्प्रेसमुळे बंगाल वॉरिअर्सचा दारुण पराभव

PKL 2021-22 : प्रो कबड्डी लीगच्या (Pro kabbadi league) आजच्या पहिल्या सामन्यात दिल्लीने दबंगगिरी दाखवत बेंगाल वॉरिअर्सचा दारुण पराभव केला.

PKL 2021-22: Dabang delhi vs Bengal warriors: सुपरफास्ट नवीन एक्स्प्रेसमुळे बंगाल वॉरिअर्सचा दारुण पराभव
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 8:48 PM

बेंगळुरु: प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League) आजच्या दिवसाच्या पहिल्या सामन्यात दबंग दिल्लीने बेंगाल वॉरिअर्सचा (Dabang delhi vs Bengal warriors) 52-35 असा तब्बल 17 पॉईंटसच्या फरकाने दणदणीत पराभव केला. नवीन कुमारच्या भन्नाट खेळाच्या बळावर दिल्लीने स्पर्धेतील तिसऱ्या विजयाची नोंद केली. रेड म्हणजे चढाईत नवीन एक्स्प्रेस समोर सगळेच बेंगाल वॉरिअर्स निष्प्रभ ठरले. नवीनने रेडमध्ये 21 आणि बोनसचे तीन असे 24 गुण मिळवले. (Pro Kabaddi League PKL 2021 22 Dabang delhi beat Bengal warriors)

बेंगाल वॉरिअर्सकडून मनिंनदर सिंगने चांगला खेळ केला. त्याने 16 पॉईंट मिळवले. रेड मध्ये दिल्लीने 36 आणि बंगालने 28 पॉईंट मिळवले. पकडीपेक्षा धारदार आक्रमणांमुळे खेळ अधिक वेगवान झाला. नवीन कुमार पहिल्या सामन्यापासून सुपर फॉर्ममध्ये आहे. अत्यंत चपळतेने रेड करण्याच्या कौशल्यामुळे प्रतिस्पर्धी संघाच्या हातालाच तो लागत नाही. आजही नवीनने असाच जबरदस्त खेळ दाखवला.

दिल्लीने आपले पहिले दोन सामने जिंकले होते. गुजरात जायंटस बरोबरचा त्यांचा तिसरा सामना टाय झाला. गुणतालिकेत दिल्लीचा संघ पहिल्या स्थानावर आहे. बेंगाल वॉरिअर्सचा हा दुसरा पराभव आहे. याआधी त्यांनी दोन सामने जिंकले होते. बेंगळुरु बुल्सकडून त्यांना पराभूत व्हावे लागले होते.

संबंधित बातम्या:

IND VS SA: 305 धावाही मोठं चॅलेंज, दक्षिण आफ्रिकेचा मार्ग अवघड, कसं ते समजून घ्या… IND VS SA: विराटाच्या शॉट सिलेक्शनवर गावस्करांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, म्हणाले…. Virat Kohli : एकच चूक वारंवार करून Out होतोय विराट कोहली, सोशल मीडियावर Troll

(Pro Kabaddi League PKL 2021 22 Dabang delhi beat Bengal warriors)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.