Pro Kabaddi 2021 Time Table Today: बेंगळुरु बुल्स विरुद्ध यू मुंबा, किती वाजता, कुठे पाहाल सामना
22 डिसेंबरपासून सुरु होणारी ही स्पर्धा पुढचा महिनाभर 22 जानेवारी 2022 पर्यंत चालणार आहे. कोविडचा धोका लक्षात घेऊन बंगळुरुमध्ये हे सर्व सामने होणार आहेत. बंद दाराआड हे सर्व सामने होणार आहेत.
बंगळरु: आजपासून प्रो कबड्डी लीगचा (Pro Kabaddi League ) थरार रंगणार आहे. 22 डिसेंबरपासून सुरु होणारी ही स्पर्धा पुढचा महिनाभर 22 जानेवारी 2022 पर्यंत चालणार आहे. कोविडचा धोका लक्षात घेऊन बंगळुरुमध्ये हे सर्व सामने होणार आहेत. बंद दाराआड हे सर्व सामने होणार आहेत.
जाणून घ्या सामन्याचे सर्व डिटेल्स:
आज संध्याकाळी 7.30 वाजता बेंगळुरु बुल्स विरुद्ध यू मुंबा सामन्याने PKL च्या आठव्या सीझनला सुरुवात होणार आहे. मागच्या सीझनमध्ये दोन्ही संघ अंतिम चारमध्ये पोहोचले होते. बेंगळुरु बुल्सचा दबंग दिल्लीकडून पराभव झाला होता. यू मुंबाला जेतेपद पटकावणाऱ्या बंगाल वॉरियर्सने पराभूत केले होते.
बेंगळुरु बुल्स विरुद्ध यू मुंबा:
बेंगळुरु बुल्स: पवन कुमार शेरावत, चंद्रन रणजीत, दीपक नरवाल, महेंदर सिंह, सौरभ नानडाल, अमित शीओरॅन, अंकित
यू मुंबा: अभिषेक सिंह, व्ही. अजिक कुमार, अजिंक्य कापरे, पंकज फाझल अत्राचाली, सुनील सिद्धगवळी, हरींदर कुमार
PKL 2021-22 चे सामने कुठे पाहता येतील?
स्टार स्पोटर्स नेटवर्कवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून तुम्ही हे सामने पाहू शकता.
सामन्याचे Live streaming कसे पाहू शकता?
डिझने+हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर हे सामने पाहता येतील
दुसरा सामना
तामिळ थलायवाज आणि तेलगु टायटन्समध्ये दुसरा सामना होणार आहे. रात्री 8.30 वाजता या सामन्याची सुरुवात होईल. मागच्या सीझनमध्ये दोन्ही संघाची सुमार कामगिरी झाली होती. टायटन्स 11 व्या स्थानावर होते. 22 पैकी त्यांना फक्त सहा सामने जिंकता आले होते. थलायवाज गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर होते. त्यांना फक्त चार सामने जिंकता आले होते.
तामिळ थलायवाज संघ:
के. प्रपंजन, अथुल एमएस, मंजीत, सागर बी क्रिष्णा, संथापानासेलवम, सुरजीत सिंह, एम अभिषेक, सागर
तेलगु टायटन्स: सिद्धार्थ देसाई, रोहित कुमार, रजनीश, अमित चौहान, सी अरुण, सुरींदर सिंह, रुतुराज कोरवी,
तिसरा सामना
दिवसातील तिसरा आणि शेवटचा सामना बंगाल वॉरियर्स विरुद्ध यूपी योद्धामध्ये रंगणार आहे. रात्री 9.30 वाजता हा सामना होईल. बंगाल वॉरियर्सचा जेतेपद कायम टिकवण्याचा प्रयत्न असेल. सातव्या सीझनमध्ये बंगाल वॉरियर्सने दबंग दिल्लीला पराभूत करुन जेतेपट पटकावले होते. यूपी योद्धा मागच्या सीझनमध्ये तिसऱ्या स्थानावर होते. एलिमिनेटरमध्ये त्यांना बेंगळुरु बुल्सने पराभूत केले होते.
बंगाल वॉरियर्स: मनिंदर सिंह, रीशंक देवदीगा, सुकेश हेगडे, मोहम्मद नबीबख्श, अबोझार मोहजरमिघानी, रिंकू नरवाल, परवीन,
यूपी योद्धा: प्रदीप नरवाल, श्रीकांत जाधव, सुरींदर गिल, नितेश कुमार, सुमीत, अशू सिंह, शुभम कुमार,