PKL 2021-22 LIVE Score and Updates, Puneri paltan vs Patna pirates: पटना पायरेटसचा पुणेरी पलटनवर दणदणीत विजय
PKL 2021-22 LIVE Score and Updates : प्रो कबड्डी लीगच्या (Pro kabbadi league) आजच्या पहिल्या सामन्यात पटना पायरेटसने विजय मिळवला आहे. त्यांचा स्पर्धेतील हा दुसरा विजय आहे.
बेंगळुरु: प्रो कबड्डी लीगच्या (Pro kabbadi league) आजच्या पहिल्या सामन्यात पटना पायरेटसने विजय मिळवला आहे. त्यांचा स्पर्धेतील हा दुसरा विजय आहे. त्यांनी पुणेरी पलटनवर 38-26 तब्बल 12 पॉईंटसच्या फरकाने दणदणीत विजयाची नोंद केली. पटनाने हरयाणा स्टीलर्स विरुद्धचा पहिला सामना जिंकला पण यूपी योद्धा विरुद्ध त्यांचा एका गुणाच्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता. आजच्या सामन्या दमदार खेळ करत पटनाने विजय मिळवला.
रेड म्हणजे चढाई आणि पकड टॅकल दोन्हीमध्ये पटना पायरेटसने दमदार कामगिरी केली. पटनाकडून सचिन आणि प्रशांत कुमार रायने दमदार रेड केल्या. पुणेरी पलटनने अनुभव राहुल चौधरीला बेंचवर बसवून ठेवलं. त्याचा फटका संघाला बसला. पुणेरी पलटनचे आतापर्यंत तीन सामने झाले असून एका सामन्यात विजय आणि दोन सामन्यात पराभव झाला आहे. दबंग दिल्लीकडून पुणेरी पलटनचा (41-30) असा पराभव झाला तर तेलगु टायटन्सवर (34-33) असा निसटत्या एका गुणाच्या फरकाने विजय मिळवला होता.
तेलगु टायटन्स आणि हरयाणा स्टीलर्समध्ये दुसरा सामना होणार आहे. चार गुणांसह टायटन्स गटात अकराव्या स्थानावर आहे. हरयाणाला स्टीलर्सला अजून विजय मिळवता आलेला नाही. गुणतालिकेत ते शेवटच्या स्थानावर आहेत. कबड्डी चाहत्यांना आज दोन्ही सामन्याचा थरार अनुभवता येणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
शामीची भेदक गोलंदाजी, दक्षिण आफ्रिकेला आणखी एक झटका
मोहम्मद शामीने डावाच्या 43 व्या षटकात देकर मुल्डरला बाद केले. ड्राइव्ह मारण्याच्या प्रयत्नात मुल्डरने यष्टीरक्षक पंतकडे सोपा झेल दिला. शामीचा हा तिसरा विकेट आहे.
-
दक्षिण आफ्रिकेने फॉलो-ऑन वाचवला
दक्षिण आफ्रिकेने फॉलो-ऑन वाचवला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 127 धावांचा टप्पा ओलांडला आहे. दक्षिण आफ्रिकेची स्थिती एकवेळ चार बाद 32 होती.
-
-
पुणे विरुद्ध पटना सामना सुरु
पुणेरी पलटन आणि पटना पायरेटसमध्ये सामना सुरु आहे. दोन्ही संघाकडे प्रत्येकी चार पॉईंट आहेत.
Published On - Dec 28,2021 7:27 PM