Pro Kabaddi League PKL 2021-22: यू मुंबाच्या अजित कुमारचा जबरदस्त खेळ पण सामना ‘टाय’
Pro Kabaddi League PKL 2021-22: थलायवाजकडे बऱ्यापैकी आघाडी होती. पण यू मुंबाने ही पिछाडी भरुन काढली. फक्त मोक्याच्याक्षणी त्यांना कामगिरी उंचावता आली नाही.
बेंगळुरु: प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro Kabaddi League) आजच्या पहिल्या सामन्यात कुठलाही निकाल लागला नाही. दोन्ही संघाचे 30-30 पॉईंटस झाल्यामुळे यू मुंबा आणि तमिळ थलायवाजचा सामना टाय झाला. यू मुंबाकडून (U mumba) अजित कुमारने (Ajith kumar) जबरदस्त खेळ केला. शेवटपर्यंत त्याने मुंबाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण शेवटच्या रेडमध्ये तमिळ थलायवाजने त्याची पकड केली. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला.
अजित कुमारने एकट्याने रेडमध्ये 14 पॉईंट मिळवले. पहिल्या सामन्यात चमक दाखवणारा अभिषेक सिंह आजच्या सामन्याहीत निष्प्रभ ठरला. त्याला फक्त दोन पॉईंट घेता आले. दिल्ली विरुद्ध सामन्यातही त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही. थलायवाजने रेडमध्ये 17 आणि मुंबाने 18 पॉईंट मिळवले. खरंतर मुंबाने या सामन्यात कमबॅक केलं. कारण दोन्ही हाफमध्ये ते सुरुवातीला पिछाडीवर होते.
थलायवाजकडे बऱ्यापैकी आघाडी होती. पण यू मुंबाने ही पिछाडी भरुन काढली. फक्त मोक्याच्याक्षणी त्यांना कामगिरी उंचावता आली नाही. आतापर्यंत या स्पर्धेत यु मुंबाच्या खात्यात फक्त एका विजयाची नोंद झाली आहे. त्यांचा एक पराभव आणि एक सामना बरोबरीत सुटला आहे.
पहिला हाफ यू मुंबा आणि तमिळ थलायवाजमध्ये रंगतदार सामना सुरु होता. पहिल्या हाफमध्ये तमिळ थलायवाज 17-14 ने पुढे होते. एकवेळ यू मुंबा आणि थलायवाजच्या पॉईंटमध्ये 10 ते 12 पॉईंटचे अंतर होते. पण पहिला हाफ संपायला काही मिनिट बाकी असताना मुंबईने कामगिरी उंचावत गुणांमधील अंतर कमी केले. थलायवाजने रेड म्हणजे चढाईत 7 आणि मुंबाने 9 पॉईंट मिळवले. पकड म्हणजे टॅकलच्या बळावर तमिळ थलायवाजला आघाडी घेता आली. थलायवाजने टॅकलमध्ये 7 तर मुंबाने अवघ्या एक पॉईंट मिळवला.
संबंधित बातम्या: IND VS SA: राहुल द्रविड ‘त्या’ कृतीमुळे ठरला हिरो, सोशल मीडियावर VIDEO होतोय व्हायरल SA vs IND, 1st Test: टीम इंडियाच्या लंच मेन्यूमध्ये चिकन चेट्टीनाद, लँब चॉप्स KL Rahul | ’99 धावांवर असताना माझ्या मनात…’ राहुलने उघड केला भावनिक गुंता